ग्रामरोजगार सेवकांचे आंदोलन सुरूच

By admin | Published: February 17, 2017 12:37 AM2017-02-17T00:37:18+5:302017-02-17T00:37:18+5:30

महाराष्ट्र राज्य महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अंतर्गत ग्रामरोजगार सेवकांनी बुधवार १५ फेब्रुवारीपासून

The agitation for village workers is continued | ग्रामरोजगार सेवकांचे आंदोलन सुरूच

ग्रामरोजगार सेवकांचे आंदोलन सुरूच

Next

मग्रारोहयोची कामे ठप्प : आंदोलनाचा दुसरा दिवस
जवाहरनगर : महाराष्ट्र राज्य महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अंतर्गत ग्रामरोजगार सेवकांनी बुधवार १५ फेब्रुवारीपासून दोन सुत्री मागण्यासाठी पुकारलेल्या राज्यव्यापी कामबंद आंदोलनामुळे जिल्ह्यातील मग्रारोहयोची कामे ठप्प झाली आहे. आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे.
राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत गावातील मजुरांना गावातच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची सुरूवात करण्यात आली होती. याकरिता ग्रामपंचायतस्तरावर ग्रामसभेच्या माध्यमातून ग्रामरोजगार सेवकांची निवड करण्यात आली. या योजनेची दस्तऐवज पुर्वी ग्रामसेवक ग्रामविकास अधिकार हाताळीत होती. जसे हजेरीपट भरणे, पंचायत समितीकडे पाठविने. १ ते १५ नमुने भरणे आदी कार्यालयीन कामे करीत होते. याकरीता ग्रामसेवक तुटपुंज मानधनावर काम करत होते. दरम्यानच्या काळात ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी यांना केंद्र व राज्यशासनाच्या विकासभिमुख योजनांचा भार सोपविण्यात आला. व्यक्तीक लाभार्थीची संख्या दिवसेंन दिवस वाढत गेली. परिणामी ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी यांनी मग्रारोहयोचे अतिरिक्त काम करण्यास नकार दिला.
आज तेच काम ग्रामरोजगार सेवकांवर देण्यात आले. आजघडीला ग्रामरोजगार सेवक पूर्णवेळ काम करीत आहे. नमुना १ ते १५ भरणे सक्तीचे केले आहे. तुटपंूज मानधनावर रोजगार सेवक जीवन जगत आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे ग्रामरोजगार सेवकाला ग्रामपंचायत समितीवर आपले मानधन काढण्यास निर्भर रहावे लागत आहे. (वार्ताहर)

१५ फेब्रुवारीपासून ग्रामरोजगार सेवकाचे काम बंद आंदोलन असल्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून ग्रामपंचायत स्तरावर प्रथम पुरूष निवड करून कामाची मागणी करून काम सुरू ठेवण्याच्या सुचना दिल्या होत्या. मात्र आंदोलनामुळे सुरू कामाची संख्या कमी झाली. नवीन कामे सुरू करण्यासाठी ग्रामपंचायत कडून कोणतीही मागणी पंचायत समितीस्तरावर आलेली नाही. परिणामी कामामध्ये कमीपणा आलेला आहे.
-के.ए. नंदेश्वर, प्रभारी सहायक कार्यक्रम अधिकारी,
मग्रारोहयो पंचायत समिती, भंडारा.

Web Title: The agitation for village workers is continued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.