कृषि महोत्सवाचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 11:34 PM2018-03-14T23:34:42+5:302018-03-14T23:34:42+5:30
कृषि विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने १० ते १४ मार्च दरम्यान आयोजित वैनगंगा कृषि महोत्सवाचा समारोप कृषि विभागांतर्गत प्रगतीशिल शेतकरी, पशुसंवर्धन विभागांतर्गत शेतकरी, शेती निष्ठ शेतकरी यांचा सत्कार तसेच महोत्सवात स्टॉल लावलेल्या शासकीय, अर्धशासकीय, निविष्ठा गट यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
आॅनलाईन लोकमत
भंडारा : कृषि विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने १० ते १४ मार्च दरम्यान आयोजित वैनगंगा कृषि महोत्सवाचा समारोप कृषि विभागांतर्गत प्रगतीशिल शेतकरी, पशुसंवर्धन विभागांतर्गत शेतकरी, शेती निष्ठ शेतकरी यांचा सत्कार तसेच महोत्सवात स्टॉल लावलेल्या शासकीय, अर्धशासकीय, निविष्ठा गट यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाबिजचे व्यवस्थापक मानकर, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी नितीन फुके, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी काशीनाथ तर्कसे, प्रकल्प संचालक ग्रामीण विकास यंत्रणा मंजूषा ठवकर, उपविभागीय कृषि अधिकारी एस. पी. लोखंडे, पदमा्कर गिदमारे, तांत्रिक अधिकारी विजय रायसिंग उपस्थित होते.
कृषि प्रदर्शन, उत्पादक ते थेट ग्राहक विक्री, परिसंवाद चर्चासत्र, शेतकरी सन्मान समारंभ, महिला बचत गट निर्मित वस्तुंचे प्रदर्शन व विक्री आणि सांस्कृतिक कार्यक्रम ही महोत्सवाची वैशिष्टये ठरली. १९९९ चे शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त प्रकाश दुर्गे यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. कृषि विभागांतर्गत प्रगतीशिल शेतकरी सुनिता गभणे पलाडी, श्रीराम मारवाडे बेटाळा, कमला गभणे, खरबी, अतुल गभणे अडयाळ, छाया गायधने मुंडीपार, सुनंदा मदनकर खोलमारा, संजय झलके कनेरी/दगडी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच पशुसंवर्धन विभागांतर्गत शेतकरी दिलीप कायते गुंथारा, नटराज फुले वासेरा, प्रमोद पटले देवरीदेव, शारदा ब्राम्हणकर बोरगाव, महादेव बोरकर निलज, पुष्पा कांबळे बोथली, दुर्योधन शेंडे चिचटोला यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.
स्टॉल लावलेल्या शासकीय गटात प्रथम पुरस्कार जिल्हा रेशीम कार्यालय भंडारा यांना तर द्वितीय पुरस्कार कृषि विज्ञान केंद्र साकोली यांना देण्यात आला. तृतीय पुरस्कार जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग व कृषि संशोधन केंद्र साकोली यांना देण्यात आला. अर्धशासकीय गटात ग्रामीण युवा प्रागतिक मंडळ भंडारा यांना प्रथम पुरस्कार तर, भंडारा जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ यांना द्वितीय पुरस्कार देण्यात आला. तृतीय पुरस्कार कृपान शेती सेवालय गोंदिया व केडीया आॅटो यांना देण्यात आला. निविष्ठा गटात महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ भंडारा यांना प्रथम तर धरती अॅग्रो केमीकल्स नागपूर यांना द्वितीय पुरस्कार देण्यात आला. न्यूजीविडू सिड्स व योगेश इरीगेशन (नेटाफीम) यांना तृतीय पुरस्कार देण्यात आला.
एफपीओ गटात नवचैतन्य शेतकरी उत्पादक कंपनी धारगाव यांनी प्रथम तर, गणेशपूर शेतकरी उत्पादक कंपनी गणेशपूर यांनी द्वितीय पुरस्कार देण्यात आला. तृतीय पुरस्कार लोकमानस व फेडर दाल मिल मंडणगाव यांना देण्यात आला. महिला बचत गटात वैष्णवी महिला बचत गट कुरमुडा यांना प्रथम तर एकता महिला बचत गट यांना द्वितीय पुरस्कार मिळाला. तृतीय पुरस्कार दूर्गा महिला बचत गट आंधळगाव यांना देण्यात आला. उपस्थितांचे आभार पदमाकर गिदमारे यांनी केले. यावेळी शेतकरी, महिला बचत गटाच्या सदस्य, नागरिक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.