कांद्री येथे कृषीपंप वीज बिल ग्राहक मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:33 AM2021-02-07T04:33:05+5:302021-02-07T04:33:05+5:30
अध्यक्षस्थानी अधीक्षक अभियंता राजेश नाईक होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून कार्यकारी अभियंता नीलेश गायकवाड, उपकार्यकारी अभियंता मोहाडी ...
अध्यक्षस्थानी अधीक्षक अभियंता राजेश नाईक होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून कार्यकारी अभियंता नीलेश गायकवाड, उपकार्यकारी अभियंता मोहाडी सुनील मोहुर्ले, सहायक अभियंता जांब शाखेचे सुधीर कुमरे, सरपंच शालू मडावी, ग्रामपंचायत सदस्य विजय बारई, वासेराचे उपसरपंच उरकुंडे उपस्थित होते. मेळाव्यात कृषीपंप वीज बिल धोरण -२०२० योजनेंतर्गत कृषीपंप ग्राहकांना कंपनीने सुरु केलेल्या विविध योजनेची माहिती देण्यात आली. यामध्ये सप्टेंबर २०२० च्या वीज बिलातील पन्नास टक्क्यामुळे थकबाकी भरल्यास उर्वरित पन्नास टक्के थकबाकी माफ तसेच विलंब आकार पूर्णपणे माफ होणार आहे. सप्टेंबर २०१५ पर्यंत थकबाकी वरील व्याज पूर्णपणे माफ सप्टेंबर२०१५ नंतरच्या थकबाकीवरील व्याज १८ टक्के न आकारता वीज आयोगाने मान्यता दिलेल्या दराने आकारणी करण्यात येणार आहे. वीज बिलात सवलत मिळविण्यासाठी चालू वीज बिले भरणे बंधनकारक आहे. या योजनेंतर्गत रोहित्र स्तरावर सर्व कृषी ग्राहकांनी चालू वीज बिल व थकबाकी भरल्यास कृषीपंपाच्या चालू वीज बिलावर दहा टक्के सवलत मिळणार असल्याची माहिती अधीक्षक अभियंता राजेश नाईक यांनी दिली. संचालन सहायक अभियंता सुधीर कुमरे यांनी तर आभार उपकार्यकारी अभियंता मोहाडी सुनील मोहुर्ले यांनी मानले.