कारखाना परिसरातील शेतजमीन निकामी

By admin | Published: January 17, 2017 12:22 AM2017-01-17T00:22:50+5:302017-01-17T00:22:50+5:30

एमआयडीसी राजेगाव (गडेगाव) येथे असलेल्या वरम बायो एनर्जी कारखान्यातील केमिकलयुक्त सांडपाणी व धूळ प्रदुषणाचे कण शेतामध्ये शिरत असल्याने शेतजमीन निकामी झालेली आहे.

Agricultural Undertaking in the factory premises | कारखाना परिसरातील शेतजमीन निकामी

कारखाना परिसरातील शेतजमीन निकामी

Next

शेतकरी संकटात : प्रकरण वरमबायो एनर्जी कारखान्याचे
भंडारा : एमआयडीसी राजेगाव (गडेगाव) येथे असलेल्या वरम बायो एनर्जी कारखान्यातील केमिकलयुक्त सांडपाणी व धूळ प्रदुषणाचे कण शेतामध्ये शिरत असल्याने शेतजमीन निकामी झालेली आहे. शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून न्याय मिळावा, यासाठी शेतकरी जिल्हा प्रशासनाकडे धावाधाव घेत आहे.
वरम बायो एनर्जी कारखान्यालगत राजेगाववासीयांची शेकडो एकर शेती आहे. हा कारखाना २००८ पासून सुरु करण्यात आला. येथून केमीकलयुक्त सांडपाणी व धुळीचे कण शेतकऱ्यांच्या शेतात येत आहे. त्यामुळे २००८ मध्ये शेतकऱ्यांनी कारखाना व्यवस्थापनाची भेट घेऊन समस्या सोडविण्याची मागणी केली. त्यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियमन मंडळ व जिल्हा प्रशासनाला निवेदन देखील देण्यात आली. तेव्हा कारखाना व्यवस्थापनाने सांडपाणी येणे बंद केले होते. मात्र त्यानंतर आजपर्यंत कारखान्यातील धूळ प्रदूषण व सांडपाणी शेतात येत आहे.
राजेगाव परिसरातील अनेक शेतकऱ्यांची शेती कारखान्यालगत असून या शेतीच्या माध्यमातून ते उदरनिर्वाह करीत होते. पावसाळ्यात धानाचे पिक घेतले जाते. त्यानंतर रब्बी पिक, हरभरा, गहू, पोपट, उडीद, मुग आदी पिके घेतली जातात. परंतु कारखाना आरंभ झाला तेव्हापासून प्रदूषणामुळे पिके नष्ट होत आहेत. कर्ज काढून दरवर्षी शेती कसली जात आहे. कारखान्यातील पाण्यामुळे उत्पादन होत नाही. प्रदूषण व सांडपाण्यामुळे पिके जळत आहेत. दुषित पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी कारखान्याच्या आवारात शोषखड्डा तयार केलेला नाही. हेतूपुरस्सर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये दूषित पाण्याचा प्रवाह सुरु आहे. तक्रार करूनही अधिकारी व व्यवस्थापनाने मोका तपासणी केलेली नाही.असे सतत सुरु असले तर शेतजमिन निकामी होत आहे. जिल्हा प्रशासनाने व प्रदूषण मंडळाने कारखाना व्यवस्थापनाला सांडपाण्याची विल्हेवाट लावून शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये अशी उपाययोजना करण्याची गरज आहे. यापूर्वी सन २००९ मध्ये प्रदूषण मंडळाचे अधिकाऱ्यांनी भेट देऊन चौकशी अहवाल तयार केला होता. त्यानंतरही कारखान्याने सांडपाणी शेतीमध्ये जाणे बंद केले नाही. जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांच्या पिकाचे होणारे नुकसान थांबविण्यासाठी कायमचा उपाय शोधावा. नुकसानभरपाईपोटी शेतकऱ्यांना भरपाई देण्यात यावी, अशी मागणी राजेगाव परीसरातील नागरिकांनी केली आहे. (नगर प्रतिनिधी)

प्रदूषणामुळे धोका
वरम बायो कारखान्यात धानाच्या कोंड्यापासून विज निर्मिती करण्यात येते. यामुळे धूर प्रदूषण वाढले आहे. कर्णकर्कश आवाजामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाली आहे. कारखान्यातील धूर कांडीतून (चिमनी) मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्यामुळे परिसरात आवागमन करणाऱ्या अनेकांना डोळ्यांचा आजार बळावला आहे. याकडे प्रदुषण विभागाने लक्ष द्यावे.

Web Title: Agricultural Undertaking in the factory premises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.