ढेंच्च्या हिरवळीचे खत वापराने शेती होते सुपीक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:22 AM2021-07-05T04:22:24+5:302021-07-05T04:22:24+5:30

पालांदूर : रासायनिक खतांची मात्रा कमी करून हिरवळीच्या खताचा उपयोग करीत जमिनीचे आरोग्य सुधारणेकरिता कृषी विभाग सरसावला आहे. पालांदूर ...

Agriculture is fertile with the use of green manure! | ढेंच्च्या हिरवळीचे खत वापराने शेती होते सुपीक!

ढेंच्च्या हिरवळीचे खत वापराने शेती होते सुपीक!

Next

पालांदूर : रासायनिक खतांची मात्रा कमी करून हिरवळीच्या खताचा उपयोग करीत जमिनीचे आरोग्य सुधारणेकरिता कृषी विभाग सरसावला आहे. पालांदूर व परिसरात कित्येक शेतकऱ्यांनी हिरवळी खताचा वापर करीत जमिनीचे आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न केला आहे. रासायनिक खत कमी वापरत उत्पादन खर्चात बचत करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले होते. त्याची अंमलबजावणी चूलबंद नदी खोऱ्यात केली जात आहे.

दिवसेंदिवस रासायनिक खतांचे भाव गगनाला भिडलेले आहेत. रासायनिक खतांच्या अवाढव्य किमतीमुळे उत्पादन खर्चात भरीव वाढ झालेली आहे. खर्चाच्या तुलनेत शेतमालाला भाव निश्चितच कमी आहे. खुल्या अर्थव्यवस्थेत खत कंपन्यांनी खतांच्या किमती अतोनात वाढवल्या आहेत. कोरोनाचे संकट व परदेशातून कच्च्या मालाचे वाढलेले भाव अशी कारणमीमांसा देत खतांचे भाव वाढवलेले आहेत. शेतकऱ्यांनी स्वावलंबन तत्त्वावर शेती करीत उत्पादनखर्च कमी करण्याकरिता हिरवळीचे खत व सेंद्रिय खताचा वापर वाढविण्याकडे कल वाढविलेला आहे. कृषी विभागाने कापणी ते बांधणीपर्यंतचे इत्थंभूत कृषी ज्ञान शेतकऱ्यांना पुरविलेले आहे. घरगुती बियाणे वापरण्यापासून तर नव्या तंत्रात रोवणीचा अभ्यास दिलेला आहे.

हिरवळीच्या खताने जमीन कोवळी होऊन सुपीक बनते. सुपीक जमीन पिकाला सकारात्मक ऊर्जा देते. रोगराइर्पासून बचाव करते. पर्यायाने कीटकनाशकांचा खर्च वाचून शेती कमी खर्चाची कसायला मोठी मदत होते. पूर्वीच्या काळी रासायनिक खत नसताना केवळ सेंद्रिय व हिरवळीच्या खताच्या भरवश्यावरच शेती उत्तम प्रकारे कसली जायची. त्यामुळे पिकात विष नसायचे. विषमुक्त अन्न मिळायचे. परंतु प्रगतिशील युगात तांत्रिक ज्ञानाचा विपर्यास झाल्याने शेतमाल रासायनिक खताच्या अधीन झाली. अधिक उत्पन्नाच्या लालसेने रासायनिक खतांचा वापर वाढला. पर्यायाने उत्पादन खर्चात भरीव वाढ झाली. त्या तुलनेत मात्र शेतमालाचे भाव वाढू शकले नाही.

बॉक्स

निरूपायाने शेतकरी कंगाल ठरला

शेतकऱ्याला सुजलाम् सुफलाम् करण्याकरिता स्वत:च्याच शेतात अल्पखर्चात हिरवळीच्या खतांचा वापर वाढविण्याचा सल्ला कृषी विभागाने पुरविला. कित्येक शेतकरी तर स्वतःच्या शेतातच हिरवळी खताचे बियाणेसुद्धा तयार करतात. हंगामात स्वतः इतर शेतकऱ्यांनाही कमी भावात पुरवितात. त्यामुळे शेतकरीवर्गाला कमी खर्चात स्वतःच्याच गावी हिरवळीच्या खताचे बियाणे सहजतेने उपलब्ध होते. पालांदूर, मचारना, मांगली, रेगोळा, कवलेवाडा आदी गावात सोनबोरू या हिरवळीच्या खताचा बियाणे करून स्वतःसह इतर शेतकऱ्यांना विक्री केला जात आहे.

कोट

सोनबोरू अत्यल्प पाण्यात पिकणारे हिरवळीचे खत आहे. एकरी उत्पादन सुमारे २५ ते ३० हजार रुपयांपर्यंत येते. याला खर्चसुद्धा अत्यल्प असून नसल्यासारखाच आहे. गत चार वर्षापासून तीन ते चार एकरात सोनबोरू पिकवितो. स्वतःसह इतरही शेतकऱ्यांना पुरवितो. कृषी विभागाने आता पुढाकार घेतला असून, शेतकरी हिरवळीच्या खताकडे वळलेले आहेत.

पराग ठवकर, प्रगतिशील शेतकरी, मचारना

Web Title: Agriculture is fertile with the use of green manure!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.