ग्रीन हेरीटेजच्या पत्राची कृषिमंत्र्यांनी घेतली दखल

By admin | Published: February 2, 2016 01:04 AM2016-02-02T01:04:06+5:302016-02-02T01:04:06+5:30

ग्रीन हेरिटेज बहु. साता. विकास संस्था भंडारा तर्फे नुकतेच नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशना दरम्यान ...

The Agriculture Minister took the letter of green heritage letter | ग्रीन हेरीटेजच्या पत्राची कृषिमंत्र्यांनी घेतली दखल

ग्रीन हेरीटेजच्या पत्राची कृषिमंत्र्यांनी घेतली दखल

Next

भंडारा : ग्रीन हेरिटेज बहु. साता. विकास संस्था भंडारा तर्फे नुकतेच नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशना दरम्यान कृषीविभागाच्या योजना जिल्ह्यातील शेतकऱ्यापर्यंत पोहचविणेबाबत देवगिरी येथे राज्याचे कृषी व महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना पत्र दिले होते. पत्राची दखल घेवून याबाबत जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी भंडारा यांना अंमलबजावणी करण्यासाठी पत्र प्राप्त झाले असून संस्थेला ही या विभागाकडून पत्राची प्रत प्राप्त झाली आहे.
ग्रीन हेरीटेज तर्फे जिल्ह्यातील काही गावांमध्ये जाऊन याबाबत काही शेतकऱ्यांनी तक्रार केली होती की, जिल्ह्यात कृषी विभागांतर्गत शेतकऱ्यांकरिता अनेक योजना राबविल्या जातात. पण त्या योजनांचा पाहिजे तसा लाभ मिळत नाही आणि संबंधित विभागाचे अधिकारी सुद्धा इकडे येत नसल्याचेही जाणवते. कृषी विभागांतर्गत कोणकोणत्या संस्था, एनजीओ कामे करीत आहेत. त्यांच्या कामाचे दरवर्षी सोशल आॅडीट ही केल्या गेले पाहिजे. अशीही त्यांची मागणी आहे.
अनेक वर्षापासून बंधारे, शेततळे ही बांधण्यात आले असून या बाबतीत सुद्धा अनेकदा कामे बरोबर न झाल्याचे वर्तमानपत्रामध्ये बातमीद्वारे कळत असते. याबाबत आपल्या कृषी विभागातर्फे चौकशी ही व्हावी अशी सर्व स्तरावरून मागणी होत असल्याचे आदी बाबत या पत्रामध्ये नमूद करण्यात आले होते.
याकरिता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कडून जिल्ह्यातील उपविभागीय कृषी अधिकारी भंडारा, साकोली तथा सर्व तालुका कृषी अधिकारी/सहाय्यक/ कृ.प./ मंकृअ/ उप-विकृअ या सर्वांनी गावामध्ये जावून शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या सर्व योजनांची माहिती द्यावी, असे आदेश देण्यात आले आहेत.

Web Title: The Agriculture Minister took the letter of green heritage letter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.