कृषी अधिकारी म्हणतात, धानपीक समाधानकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 09:22 PM2018-10-17T21:22:48+5:302018-10-17T21:23:16+5:30
मंडळ कृषी कार्यालय सिहोरा अंतर्गत येणाऱ्या ७३ गावांच्या शेत शिवारात लागवड करण्यात आलेले धानाचे पिक समाधानकारक असल्याची पावती मंडळ कृषी अधिकारी एस.जी. उईके यांनी दिले आह. पंरतू करपा, तुडतुडा रोगांचे प्रमाण अल्प असल्याचे नाकारले नाही.
रंजीत चिंचखेडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : मंडळ कृषी कार्यालय सिहोरा अंतर्गत येणाऱ्या ७३ गावांच्या शेत शिवारात लागवड करण्यात आलेले धानाचे पिक समाधानकारक असल्याची पावती मंडळ कृषी अधिकारी एस.जी. उईके यांनी दिले आह. पंरतू करपा, तुडतुडा रोगांचे प्रमाण अल्प असल्याचे नाकारले नाही.
सिहोरा स्थित असणाºया मंडळ कृषी कार्यालयाला तुमसर तालुक्यातील ७३ गावांचा प्रशासकीय कारभार जोडण्यात आलेला आहे. सिंचन क्षेत्र आणि विस्तारित क्षेत्र मोठे असले तरी यंत्रणा शेतकºयांचे बांधावर पोहचत आहे. या कार्यालय अंतर्गत यंदा १४ हजार हेक्टर आर शेतशिवारात धान पिकांची लागवड करण्यात आली आहे. आॅक्टोबर महिन्यात धान पिकाची विशेष काळजी घेण्याचे प्रयत्न शेतकरी करित आहे.
या महिन्यात धानाचे पीक गर्भावस्थेत असल्याने औषधाची फवारणी करिता शेतकºयांचा वाढता कल आहे. धानाचे पिकांना रोगांची लागण आधीच अतिरिक्त औषधचे फवारणी करण्यात येत आहे. यंदा कृषी विभागाचे पथकाने ७३ गावांतील शेतशिवारात धान पिकांची पाहणी केली आहे. या पाहणीत धानाचे पीक समाधानकारक असल्याचे दिसून आले आहे. काही शेतशिवारात करपा आणि तुडतुडा रोगाने हजेरी लावल्याचे दिसून आले आहे.
या रोगांचे प्रमाण ५ टक्के असल्याची माहिती कृषी कार्यालयाने दिली आहे. धानाचे पिकांना सुरक्षीत व रोगमुक्त करण्यासाठी हॉय डोज औषधाची फवारणी विना मार्गदर्शनाने शेतकरी करित असल्याने, धानाचे पिकांना नुकसान होत आहे. औषधाची फवारणी करताना कृषी विभागाने गाईड लाईन पत्रक तयार केली आहे. या मार्गदर्शण पत्रात चार गटात विभागणी करण्यात आली आहे. शेतकरी यांना नियोजित आणि वेळेवर मार्गदशृन करण्यासाठी कृषी सहायकांचे पथक तयार करण्यात आले आहे.
तुमसर तालुक्यात विस्तारीत क्षेत्रफळाने सिहोराचे मंडळ कृषी कार्यालय मोठे असून व्याप अधिक आहे. यामुळे अल्प कर्मचारी कार्यरत असताना शेतकºयांचे मदतीकरिता पथकाचे नियोजन करण्यात आली आहेत. सध्या स्थितीत धानाचे पिकांची अवस्था समाधानकारक असली तरी उर्वरित कालावधीत धान पिकाचे बाबतीत सावध राहण्याचे मार्गदर्शन शेतकºयांना कृषी विभागाचे करित आहेत. सिहोरा परिसरातील ४७ गावाचे शेत शिवारात चांदपूर जलाशयाचे पाणी सोडण्यात आले आहे. पावसाडा अल्प झाला असताना सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाने जलाशयाला तारले आहे. आमदार चरण वाघमारे यांचे प्रयत्नाने प्रकल्प स्थळात निरंतर वीज पुरवठा सुरू आहे. त्यांचे प्रयतनामुळेच रब्बी हंगामात उन्हाळी धान पिकांना वाढीव क्षेत्रात पाणी वाटपाचे मार्ग मोकळा झाला आहे. धान पिकांची स्थिती समाधानकारक आहे. ज्या शेतशिवारात दलदलचे प्रमाण अधिक आहे अशा भागातील पिकांवर करपाचे प्रमाण आहे. परंतु सर्वच शिवारात अशी परिस्थिती नाही. यामुळे शेतकºयांचे योग्य मार्गदर्शनासाठी असणाºया मंडळ कृषी कार्यालयात संपर्कात राहण्याची आवश्यकता आहे.
सध्या स्थित धानाचे पीक समाधानकारक असून करपा व तुडतुडा रोगाचे प्रमाण अल्प आहे. शेतकºयांनी मार्गदर्शन घेतले पाहिजे. औषधांची फवारणी करताना सावधपणा ठेवण्याची आवश्यकता आहे.
-एस.जी. उईके,
मंडळ कृषी अधिकारी सिहोरा.