शासनाने जाहीर केलेली मदत तुटपुंजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:15 AM2021-05-04T04:15:57+5:302021-05-04T04:15:57+5:30
भंडारा : संचारबंदी आणि लाॅकडाऊनमुळे रोजगार गमविलेल्या व व्यवसाय बंद असलेल्या सर्वांना तातडीची मदत म्हणून प्रत्येकी किमान दहा हजार ...
भंडारा : संचारबंदी आणि लाॅकडाऊनमुळे रोजगार गमविलेल्या व व्यवसाय बंद असलेल्या सर्वांना तातडीची मदत म्हणून प्रत्येकी किमान दहा हजार रुपये देण्यात यावे, अशी मागणी माजी नगरसेवक हिवराज उके यांनी केली आहे. यापूर्वी महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेली मदत अतिशय तुटपुंजी असून, तीही अद्यापपर्यंत लाभार्थ्यांना मिळालेली नाही. नावनोंदणी केलेले असो वा नसो, अशा घरेलू कामगार, रिक्षावाले, फेरीवाले, फुटपाथ दुकानदार, बॅण्ड बाजा, सलून, छोटे कारागीर, फळभाजी विक्रेते व इतर सर्व असंघटित कामगार यांना सरसकट दहा हजार रुपये तातडीने व सुचविल्याप्रमाणे आर्थिक मदत करावी व प्रत्यक्षात ही मदत त्यांच्यापर्यंत पोहोचावी, याची खात्री करावी. या परिस्थितीत कोरोना महामारीवर योग्य नियोजन व उपाययोजना होण्यासाठी स्थानिक, जिल्हा व राज्य पातळीवर सर्व राजकीय पक्षांना, तसेच स्वयंसेवी संस्था व संघटनांना विश्वासात घेऊन दक्षता समित्या तयार करून त्यांच्या सूचनांची दखल घ्यावी, अशीही मागणी भाकपतर्फे हिवराज उके यांनी केली आहे.