ऐन पावसाळ्याच्या तोंडावर तलाठ्याने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:23 AM2021-06-21T04:23:32+5:302021-06-21T04:23:32+5:30
ईटान येथील नागरिकांत खळबळ २० लोक ०६ जे लाखांदूर : शासनाद्वारे पुनर्वसन केले जाऊनदेखील स्थानिक नागरिकांद्वारा स्थानांतरण न करण्यात ...
ईटान येथील नागरिकांत खळबळ
२० लोक ०६ जे
लाखांदूर : शासनाद्वारे पुनर्वसन केले जाऊनदेखील स्थानिक नागरिकांद्वारा स्थानांतरण न करण्यात आल्याने दरवर्षी पुराच्या प्रकोपाने स्थानिक ईटान येथील नागरिकांना विविध नुकसानीचा सामना करावा लागत आहे. या स्थितीत पुनर्वसित नागरिकांद्वारा स्थानांतरण न केल्या गेल्याने यंदाच्या पावसाळ्यात नदीला येणाऱ्या पुरामुळे प्रभावित तथा क्षतिग्रस्त कुटुंबांना शासनाद्वारे कोणतीही नुकसानभरपाई दिली जाणार नसल्याची धमकीपूर्ण नोटीस स्थानिक तलाठ्यामार्फत देण्यात आल्याने स्थानिक ईटान येथील नागरिकांत मोठी खळबळ माजली आहे.
प्राप्त माहितीनुसार, जवळपास ५० वर्षांपूर्वी वैनगंगा नदीकाठावर वसलेल्या ईटान गावाचे पुनर्वसन केले गेले. या पुनर्वसनांतर्गत ईटान गावापासून जवळपास २ कि.मी. अंतरावर ईटान-कऱ्हांडला मार्गावर जमीन उपलब्ध करून गावातील जवळपास ३०० कुटुंबांना प्लॉट उपलब्ध करण्यात आले. मात्र, शासनाद्वारे करण्यात आलेल्या पुनर्वसनाअंतर्गत कुटुंबांना आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने गावातील अधिकतर कुटुंबांनी स्थानांतरणाला विरोध केला.
दरम्यान, गावातीलच काही कुटुंबांनी पुनर्वसनांतर्गत उपलब्ध जमिनीवर स्थानांतरण करून अन्य कुटुंबांना देण्यात आलेल्या प्लॉटवर देखील अतिक्रमण केले असल्याचा आरोप केला आहे. तथापि, दरवर्षी गावात वैनगंगा नदीला येणाऱ्या पुराच्या पाण्याने सर्व कुटुंबांच्या घरांसह शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने शासनाला दरवर्षी पूरपीडितांना साहाय्यता अंतर्गत नुकसानभरपाई दिली जाते. मात्र, यंदा पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पूरपरिस्थितीत पीडित कुटुंबांना शासनाद्वारे कुठलीही मदत किंवा नुकसानभरपाई दिली जाणार नसल्याची नोटीस स्थानिक तलाठ्यामार्फत नागरिकांना देण्यात आल्याने नागरिकांत मोठी खळबळ माजली आहे.
यंदाचा पावसाळा सुरू होताच गत ५० वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या पुनर्वसनांतर्गत स्थानांतरणासाठी स्थानिक तलाठ्यामार्फत नोटीस बजावण्यात आल्याने महसूल प्रशासनाविरोधात नागरिकांत रोष व्यक्त केला जात आहे. या स्थितीत शासन, प्रशासनाने तत्काळ दखल घेत पावसाळ्याच्या तोंडावर ईटान निवासी नागरिकांना पुनर्वसित जागेवर स्थानांतरणाची नोटीस बजावणाऱ्या तलाठ्याविरोधात उचित कार्यवाही करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.