महिलांनी आयाेजित केलेल्या दारूबंदीच्या सभेत मद्यपींचा गाेंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:42 AM2021-09-08T04:42:47+5:302021-09-08T04:42:47+5:30
तालुक्यातील गवराळा येथे तीस वर्षांपासून दारूबंदी आहे. गावात शांततेचे वातावरण आहे; परंतु काही समाजकंटकांनी गत काही महिन्यांपासून छुप्या पद्धतीने ...
तालुक्यातील गवराळा येथे तीस वर्षांपासून दारूबंदी आहे. गावात शांततेचे वातावरण आहे; परंतु काही समाजकंटकांनी गत काही महिन्यांपासून छुप्या पद्धतीने दारू विक्री सुरू केली. हा प्रकार महिलांचा लक्षात आला. याबाबत पाेलिसांना माहिती देण्यात आली. त्यांनी कारवाई केली. मात्र, दारू विक्री थांबली नाही. यामुळे गावातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे महिलांनी मंगळवार, ७ सप्टेंबर राेजी दुपारी ४ वाजता गावातील गांधी चाैकात दारूबंदीसाठी सभा आयाेजित केली. या सभेला सरपंच, पाेलीस पाटील यांच्यासह माेठ्या संख्येने गावकरी एकत्र आले हाेते.
दारूबंदीसाठी सभा सुरू असताना मद्यपींनी येथे येऊन गाेंधळ घातला. त्यामुळे संतापलेल्या गावकऱ्यांनी लाखांदूर पाेलिसांना पाचारण केले. ठाणेदार रमाकांत काेकाटे, पाेलीस उपनिरीक्षक संदीप ताराम, अमाेल काेकाटे, हवालदार गाेपाल काेसरे, पाेलीस नायक दुर्याेधन वकेकार, अमलदार मनिष चाैहान, टेकचंद बुराडे यांनी मद्यपींना जेरबंद केले.
या बैठकीला पाेलीस पाटील नामदेव प्रधान, सरपंच राहुल मेश्राम, उपसरपंच विलास प्रधान, सदस्य शालू कुंभरे, सीमा खरकाटे, मनीषा शहारे, श्रृती मेश्राम, ममता मेश्राम, रेखा प्रधान, काशीराम भुरले, तुळशीराम ठाकरे, लाेचन पारधी, याेगेश खरकाटे, मारुती शहारे, भरत खरकाटे, प्रभाकर खरकाटे, विलास शहारे, मानिक केळझरकर, रमेश केळझरकर, वंदना शहारे, माला पारधी, माया चाेपकर, सुधा मेश्राम आदी उपस्थित हाेते.
070921\1927-img-20210907-wa0039.jpg
गवराळा येथे आयोजीत दारुबंदीसाठी सभा