गवराळावासीयांच्या पुढाकाराने दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:42 AM2021-09-10T04:42:43+5:302021-09-10T04:42:43+5:30

मयूर केझरकर (२२) व सुनील मेंढे (४५, दोन्ही रा. गवराळा) असे अवैधरीत्या देशी-विदेशी दारूची साठेबाजी करणाऱ्यांची नावे असून, त्यांच्याविरोधात ...

Alcohol confiscated on the initiative of Gawrala residents | गवराळावासीयांच्या पुढाकाराने दारू जप्त

गवराळावासीयांच्या पुढाकाराने दारू जप्त

Next

मयूर केझरकर (२२) व सुनील मेंढे (४५, दोन्ही रा. गवराळा) असे अवैधरीत्या देशी-विदेशी दारूची साठेबाजी करणाऱ्यांची नावे असून, त्यांच्याविरोधात लाखांदूर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तालुक्यातील गवराळा गावात गत दोन दिवसांपूर्वी दारूबंदीचा निर्णय घेतला होता. या निर्णयाकरिता आयोजित सभेत गावातीलच चार मद्यपींनी गदारोळ करण्यात आल्याने तत्काळ लाखांदूर पोलिसांना पाचारण करून गदारोळ करणाऱ्या चार मद्यपींना लाखांदूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते. त्यानुसार पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी गदारोळ करण्याच्या प्रकरणात गुन्हा नोंदविला होता.

गत दोन दिवसांपूर्वी गावात दारूबंदी करूनही घटनेतील आरोपींद्वारे स्वत:च्या राहत्या घरात अवैधरीत्या देशी-विदेशी दारूची साठेबाजी केल्याची माहिती गावकऱ्यांना मिळाली. त्यानुसार गावकऱ्यांनी गावात अवैधरीत्या देशी- विदेशी दारूची साठेबाजी केली असल्याची माहिती लाखांदूर पोलिसांना दिली. माहितीवरून लाखांदूरचे ठाणेदार रमाकांत कोकाटे, पोलीस उपनिरीक्षक संदीप ताराम, हवालदार गोपाल कोसरे, अंमलदार मिलिंद बोरकर, मनीष चव्हाण, योगराज घरट, अविनाश खरोले यांसह अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहचून घरातील दारू जप्त केली. या घटनेत दोन्ही आरोपीतांविरोधात लाखांदूर पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

बॉक्स :

एलसीबी पथकाद्वारे दारू जप्त

अवैधरीत्या देशी-विदेशी दारूची विक्री करण्यासाठी साठेबाजी करण्यात आल्याची गोपनीय माहिती भंडारा येथील एलसीबी पोलिसांना देण्यात आली होती. गोपनीय माहीतच्या आधारे त्यांच्याद्वारे दोन विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत ३ हजार ६६० रुपयांची देशी-विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई गत ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजताचे सुमारास तालुक्यातील ईटान व मोहरणा गावात करण्यात आली. या दोन्ही घटनेत श्रीकृष्ण दिघोरे (३५, रा. खैरणा) व वसंत ऊके (६०, रा मोहरणा) आदींविरोधात लाखांदूर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

090921\img-20210909-wa0026.jpg

मोहरणा येथील महिलांनी पकडलेला अवैध देशी विदेशी दारुसाठा

Web Title: Alcohol confiscated on the initiative of Gawrala residents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.