भंडारा जिल्ह्यात मद्यविक्रीला परवानगी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2020 01:37 PM2020-05-04T13:37:53+5:302020-05-04T13:38:23+5:30
शासनाने दारू विक्रीस परवागनी दिली असली तरी ऑरेंज झोनमध्ये असलेल्या भंडारा जिल्ह्यात मात्र दारू विक्रला परवानगी नाकारण्यात आली आहे. त्या बाबतचा सुधारित आदेश सोमवारी दुपारी निर्गमित केला. त्यामुळे मद्य शौकीनांची निराशा झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शासनाने दारू विक्रीस परवागनी दिली असली तरी ऑरेंज झोनमध्ये असलेल्या भंडारा जिल्ह्यात मात्र दारू विक्रला परवानगी नाकारण्यात आली आहे. त्या बाबतचा सुधारित आदेश सोमवारी दुपारी निर्गमित केला. त्यामुळे मद्य शौकीनांची निराशा झाली.
भंडारा जिल्हा ऑरेंज झोनमध्ये असल्याने मद्य विक्रीला परवागी मिळेल असे मद्य शौकीनांना वाटत होते. सोमवारी शहराती इतर दुकाने सकाळी सुरु झाल्याने अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र दुपारी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढून जिल्ह्यातील मद्यविक्रीची सर्व दुकाने पूर्वीप्रमाणेच बंद राहतील असे आदेशात म्हटले आहे.
याच आदेशात अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरु राहणार असल्याचे स्पष्ट केले. शॉपिंग काँप्लेक्स मात्र बंद राहणार आहे. निवासी इमारती व नागरी कॉलनीतील स्वतंत्र दुकाने सुरु करण्यासही परवानगी देण्यात आली आहे. तसेच ग्रामीण भागातील दुकाने अटींचे पालन करुन सुरु ठेवण्याचे निर्देश दिले आहे. भंडारा तालुक्यातील कंटेनमेंट व बफर झोनमधील गावे व क्षेत्र वगळून ही परवानगी राहणार आहे.