साकोली-चंद्रपूर बसमधून दारुची वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 09:58 PM2019-03-24T21:58:52+5:302019-03-24T21:59:22+5:30
येथून १० कि.मी. अंतरावरील सोनी (चप्राड) बसस्थानकावर साकोली वरून चंद्रपुरला जाणाऱ्या बसमधून २५ हजार ८७० रुपए किंमतीच्या देशी दारूची वाहतुक करणाऱ्या एका महिला व एका पुरूषास स्थिर सर्वेक्षण पथकाकडून रंगेहात पडण्यात आल्याची घटना रविवारला (ता.२४) रोजी सकाळी ११ वाजता सुमारास घटली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदुर : येथून १० कि.मी. अंतरावरील सोनी (चप्राड) बसस्थानकावर साकोली वरून चंद्रपुरला जाणाऱ्या बसमधून २५ हजार ८७० रुपए किंमतीच्या देशी दारूची वाहतुक करणाऱ्या एका महिला व एका पुरूषास स्थिर सर्वेक्षण पथकाकडून रंगेहात पडण्यात आल्याची घटना रविवारला (ता.२४) रोजी सकाळी ११ वाजता सुमारास घटली आहे.
कामेश बदाम भोयर (३१), शबाना रज्जक शेख (४४) अशी आरोपींची नावे असून दोन्ही रा. गौतमनगर, न्युरानी चौक वार्ड नं. ३८ गोंदिया येथील रहीवाशी आहेत. दोन्ही आरोपींनी साकोली येथे सुमारे २५ हजार ८७० रूपयाच्या देशी दारूचा मुद्देमाल घेऊन काळ्या रंगाच्या चार बॅग घेऊन साकोली आगारातून चंद्रपुरला जाणाºया एम.एच.४०, एच. ८९०२ क्रमांकाच्या बस मध्ये बसले. दरम्यान लाखांदुर तालुक्यातील सोनी बस स्थानकावर आचारसंहिता जाहीर झाली. त्या दिवसापासून सर्वेक्षण पथकाद्वारे चौकशी चालू असल्याने सदरची घटना समोर आली आहे.
ही कारवाई स्थिर सर्वेक्षण पथकाचे कर्मचारी शैलेष रंगारी, उत्तम चचाने, चंद्रशेखर उईके, पोलीस शिपाई हुमने, मिथुन खोब्रागडे यांनी केली व लाखांदुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निशांत मेश्राम यांच्या स्वाधिन केल्यानंतर दोन्ही आरोपींवर कलम ६५ (अ) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.