सर्व कृषीपंप सौर ऊर्जेवर आणणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 12:08 AM2017-09-01T00:08:09+5:302017-09-01T00:08:21+5:30

भंडारा जिल्ह्यातील सर्व कृषी पंप सौर ऊर्जेवर सुरू करण्यासाठी नियोजन करणे गरजेचे आहे.

All agricultural pumps will be brought to solar energy | सर्व कृषीपंप सौर ऊर्जेवर आणणार

सर्व कृषीपंप सौर ऊर्जेवर आणणार

Next
ठळक मुद्देचंद्रशेखर बावनकुळे : सहा प्रस्तावित वीज उपकेंद्रासह चार नवीन वीज उपकेंद्राचे भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भंडारा जिल्ह्यातील सर्व कृषी पंप सौर ऊर्जेवर सुरू करण्यासाठी नियोजन करणे गरजेचे आहे. यासाठी महावितरण आणि जिल्हा प्रशासनाने योजना तयार करावी, असे निर्देश राज्याचे ऊर्जा, नवीन व नवीनीकरण ऊर्जा आणि उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
महावितरणच्या मंडळ कार्यालय परिसरात सहा प्रस्तावित वीज उपकेंद्राचे आणि चार नवीन वीज उपकेंद्राचे भूमिपूजनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार रामचंद्र अवसरे होते. यावेळी आ.चरण वाघमारे, आ.राजेश काशिवार, भंडाराचे नगराध्यक्ष सुनिल मेंढे, तुमसरचे नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज सुर्यवंशी, महावितरणचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत, गोंदिया परीमंडळाचे मुख्य अभियंता जिजोबा पारधी, अधीक्षक अभियंता ओमकार बारापात्रे, राकेश जनबंधू उपस्थित होते.
यावेळी ना.बावनकुळे म्हणाले, नवीन वीज उपकेंद्राच्या कामावर ३० कोटी रूपये तर लोकार्पण केलेल्या वीज उपकेंद्राच्या कामावर २४ कोटी रूपये खर्च झाले आहेत. सद्यस्थितीत शेतकºयांना आठ तास वीज देत आहोत, परंतु सौर ऊर्जेवर कृषी पंपावर १२ तास वीज देणे शक्य होणार आहे. यासाठी स्वतंत्र सौर कृषी वाहिन्यांची गरज आहे आणि त्यासाठीचा प्रस्ताव तयार करण्याचे सूचना दिले आहेत. गावागावांत शेती पंपाला सौर कृषी वाहिनीच्या माध्यमातून वीज पुरवठा करण्यासाठी काही ठिकाणी भाडे तत्त्वावर जमीन घेणार असल्याचे जाहीर केले.
सन २०३० पर्यंत पूर्व विदर्भात वीज वितरण जाळे मजबूत करण्यासाठी महावितरण व महापारेषणच्या अधिकाºयांनी एकत्रित बसून नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शेतकºयांनी व वीज ग्राहकांनी आधुनिकीकरणाचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले. मागील दोन वर्षात २४४ कोटी रूपयांची कामे झाले असून तेवढयाच रकमेची कामे प्रगतीपथावर आहेत. भंडारा शहरात १५ कोटी रूपये खर्च करून वीज वाहिनी भूमिगत करण्याचे जाहीर केले. मुख्यालयी न राहणाºया कर्मचाºयांवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
प्रस्ताविक अधीक्षक अभियंता सुरेश मडावी यांनी केले. संचालन उपकार्यकारी अभियंता पराग फटे यांनी तर आभारप्रदर्शन कार्यकारी अभियंता शर्मिला इंगळे यांनी केले.

महावितरणच्या कार्यालयात आढावा बैठक
भूमिपूजनाच्या कार्यक्रमानंतर ना.चंद्रशेखर बावनकुळे यांनी महावितरण व महापारेषणच्या वरिष्ठ अधिकाºयांची महावितरण मंडळ कार्यालयात आढावा बैठक घेतली. महावितरणचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत, गोंदिया परीमंडळ कार्यालयाचे मुख्य अभियंता जिजोबा पारधी, नागपूर परीमंडळाचे मुख्य अभियंता आर.जी. शेख, चंद्रपूर परीमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल व महापारेषणचे मुख्य अभियंता व्ही.बी.बढे उपस्थित होते.
 

Web Title: All agricultural pumps will be brought to solar energy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.