समाजाच्या उत्थानासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक

By admin | Published: February 4, 2017 12:21 AM2017-02-04T00:21:45+5:302017-02-04T00:21:45+5:30

कुठलाही समाज मनुष्याच्या उन्नतीकरीता नेहमी प्रयत्नशील असतो. मात्र आपण समाजासाठी काय चांगले करू शकतो, यावर सर्वांनी विचार केला पाहिजे.

All the co-operation needed for the upliftment of society | समाजाच्या उत्थानासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक

समाजाच्या उत्थानासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक

Next

तारिक कुरैशी यांचे आवाहन : शिवहरे कलार समाजातर्फे वसंतपंचमी उत्सव
भंडारा : कुठलाही समाज मनुष्याच्या उन्नतीकरीता नेहमी प्रयत्नशील असतो. मात्र आपण समाजासाठी काय चांगले करू शकतो, यावर सर्वांनी विचार केला पाहिजे. जिल्ह्यातील खासदार, आमदार व अन्य लोकप्रतिनिधी भाजप पक्षाचे आहेत. या सर्वांनी मिळून शिवहरे कलार समाजाच्या उत्थानाकरिता भरीव मदत केली पाहिजे, असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष तारिक कुरैशी यांनी केले.
शिवहरे कलार समाज सेवा समिती भंडाराच्या वतीने १ फेब्रुवारीला स्टेशन मार्गावर स्थित शिवहरे कलार समाज भवनात वसंत पंचमी उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी ते अध्यक्षीय स्थानाहून बोलत होते. यावेळी मंचावर नागपूरचे उद्योगपती दिपक जयस्वाल, कैलाश नशिने, नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुनिल मेंढे, नवनिर्वाचित नगरसेवक अ‍ॅड. विनयमोहन पशिने, विक्रम उजवणे, रमनलाल उजवणे, समितीचे संयोजक मुकेश थानथराटे, समितीचे अध्यक्ष विनोद थानथराटे, चंद्रकांत पशिने, ललीत कटकवार, प्रविण उजवणे, शैलेंद्र पशिने, टिकाराम खुबेले (रायबरेली), छत्तीसगड कलार समाजाचे अध्यक्ष गौरीशंकर शिवहरे, राजन कटकवार आदी उपस्थित होते.
उत्सवाचे उद्घाटन श्री. सहस्त्रबाहू यांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलनाने करण्यात आले. या वसंत पंचमी उत्सवात दोन जोडपी विवाहबद्ध झालीत. शिवहरे समाजाच्या इच्छूक वर-वधूंनी मंचावर येवून परिचय दिला. यादरम्यान नवनिर्वाचित नगरसेवक अ‍ॅड. विनयमोहन पशिने व विक्रम उजवणे यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. समाजाचे मुख्य कार्यकर्ता अशोक कटकटवार यांचाही शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकातून मुकेश थानथराटे यांनी २०१९ पर्यंत शिवहरे कलार सांस्कृतीक भवनाचे कार्य पुर्ण करण्याचा मानस व्यक्त केला. तसेच समाज बांधवांना यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. यासाठी नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुनिल मेंढे यांनी परिसराच्या विकासासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
याचवेळी गोंदिया येथील रहिवासी गणेश उजवणे यांनी समाजाच्या इमारत बांधकामासाठी अडीच लक्ष रूपये देण्याची घोषणा केली. कार्यक्रमाचे संचालन मंजू थानथराटे, लोकेश मोहबंशी, प्रविण उजवणे व मुनमून नशिने यांनी केले. आभार समितीचे अध्यक्ष विनोद थानथराटे यांनी मानले. उत्सवासाठी मनोज उजवणे, नितीन कारवट, सुनिल पशिने, सुरेश राजाभोज, विनोद शिवहरे, विनोद नशिने, अशोक राजाभोज, राजा थानथराटे, संजय कटकवार, नविन उजवणे, अशोक टंडेय्या, राजा कटकवार, प्रकाश थानथराटे, विरेंद्र कटकवार, गुरूदत्त पशिने, अजित उजवणे, हितेश राजाभोज, रौणक उजवणे, बॉबी कटकवार, तुषार कटकवार, दिनेश कटकवार, रूपा शाह, रश्मी उजवणे, गीता कटकवार, राणी राजाभोज, कल्पना शिवहरे, संध्या थानथराटे आदींनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)

Web Title: All the co-operation needed for the upliftment of society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.