सर्व शाळा घंटानाद करून आंदोलनकर्त्यांना देणार पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:07 AM2021-03-04T05:07:21+5:302021-03-04T05:07:21+5:30
२९ जानेवारीपासून मुंबई येथील आझाद मैदानात राज्यातील विनाअनुदानित शिक्षक हजारोंच्या संख्येने आंदोलन करीत आहेत. घोषित शाळांना २० टक्के, ...
२९ जानेवारीपासून मुंबई येथील आझाद मैदानात राज्यातील विनाअनुदानित शिक्षक हजारोंच्या संख्येने आंदोलन करीत आहेत. घोषित शाळांना २० टक्के, २० टक्के अनुदानित शाळांना ४० टक्के अनुदान द्यावे, अघोषित शाळा, नैसर्गिक तुकड्या व उच्च माध्यमिक विद्यालयांना अनुदानासह घोषित करावे, प्रचलित नियमानुसार अनुदान द्यावे, संपूर्ण सेवा सरंक्षण द्यावे, वैद्यकीय प्रतिपूर्ती योजनेचा लाभ द्यावा, या मागण्यांसाठी सदर आंदोलन सुरू आहे. आंदोलनात महिलांची संख्यादेखील लक्षणीय असून, लहान मुले घेऊन त्या आंदोलनात सहभागी आहेत. आतापर्यंतच्या आंदोलनात सत्ताधारी व विरोधी पक्षातील अनेक मान्यवरांनी आंदोलन स्थळी भेट दिली व आंदोलनकर्त्या शिक्षकांसोबत संवाद साधून तुम्हाला नक्कीच न्याय मिळवून देऊ, असे आश्वासन दिले; परंतु आज एक महिना झाला तरी अजून काहीच निर्णय झाला नाही. त्यामुळे आंदोलन करणाऱ्या शिक्षकांना पाठिंबा देण्यासाठी सर्व संस्थाचालक, मुख्याध्यापक संघ, सर्व अनुदानित शिक्षक संघटना व विद्यार्थ्यांनी सोशल डिस्टन्सचे पालन करीत त्यांच्या शाळेतच एकत्र येऊन सदर आंदोलन करणाऱ्या शिक्षकांना पाठिंबा देण्यासाठी ४ मार्च रोजी आपापल्या शाळेतच व शाळेच्या वेळेतच सकाळी ११ वाजता घंटानाद करावा, असे आवाहन शिक्षण समन्वय संघाने केले आहे.