खरेदीत दुधाची लूट होत असल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:32 AM2021-04-26T04:32:27+5:302021-04-26T04:32:27+5:30

ग्रामीण भागात शेती व्यवसायाला पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन व्यवसाय करण्यात येतो. गाय, म्हैस पालन दूध विक्रीच्या व्यवसायासाठी केले जात ...

Alleged robbery of milk in purchase | खरेदीत दुधाची लूट होत असल्याचा आरोप

खरेदीत दुधाची लूट होत असल्याचा आरोप

Next

ग्रामीण भागात शेती व्यवसायाला पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन व्यवसाय करण्यात येतो. गाय, म्हैस पालन दूध विक्रीच्या व्यवसायासाठी केले जात आहे. सिहोरा परिसरात दुधाचे उत्पादन अधिक असल्याने दोन गावांची मिळून एक दूध डेअरी कार्यरत आहे. या डेअरींना दूध पुरवठा करणारे व्यावसायिक सुद्धा आहेत. दुधाची खरेदी लिटरने करण्यात येत आहे. दुधाची खरेदी करताना पारदर्शकता ठेवण्यात येत नसल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे. नव्या कोऱ्या लिटरला छेडछाड करण्यात येत आहेत. हे लिटरचे माप आकाराने मोठे केले जात आहेत. अनेक लिटरला छिद्र करण्यात आले असून, एमसील लावण्यात आले आहेत. लिटरच्या आतील भागात खोलगट भाग करण्यात आले आहेत. प्रती लिटरमध्ये शंभर ग्रॅम लिटरची लूट करण्यात येत आहे. दुधाची खरेदी करताना झुकते माप ठेवण्यात येत असल्याने त्यातही अधिक दूध खरेदी करताना लुटले जात आहे. एका लिटरमागे शेतकरी व पशुपालकांना दोनशे ग्रॅमचे नुकसान सहन करावे लागत आहे. दुधाची खरेदी किलोच्या दराने करण्यात येत नाही. लिटरमध्ये अतिरिक्त छेडछाड करून लूट करताना गौडबंगाल करण्यात येत आहे. काही शेतकऱ्यांनी नव्या कोऱ्या लिटरच्या साहाय्याने दूध खरेदी करण्याची मागणी लावून धरली होती. खरेदीदारांनी दूध खरेदी करताना या शेतकरी व पशुपालकांना टार्गेट केले होते. गावातच दूध खरेदी करण्याची सोय असल्याने कुणी याविरोधात आवाज उठविण्यासाठी पुढाकार घेत नाहीत. असे असताना साधी चौकशी करण्यात येत नाही. फॅट व डिग्री तंतोतंत तपासली जात असताना शेतकरी दूध विक्रीत फसले जात आहेत. दुधाची खरेदी करताना फॅट व डिग्री पारदर्शक पद्धतीने तपासले जात आहे. असे लिटरने दूध खरेदी करताना पारदर्शकता ठेवण्यात येत नाही. दूध डेअरी व खरेदीदारांना कुणाचा विरोध नाही, परंतु शेतकरी व पशुपालकांना न्याय देताना लूट होणार नाही अशी खबरदारी कुणी घेत नाही. दूध खरेदी करणाऱ्या लिटरची गुणवत्ता तपासण्याचे अधिकार अन्न व औषधी प्रशासनाला आहेत. परंतु, लिटर कधी तपासले जात नाहीत. नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर एका शेतकऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले. दूध खरेदीदाराला लिटरविषयी बोलले असता दूध घेणेच बंद केले होते. यानंतर शांत बसणे योग्य असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

बॉक्स

नव्या कोऱ्या लिटरची सक्ती करा

दुधाची खरेदी करताना डेअरी व खरेदीदारांना नव्या कोऱ्या लिटरचीच सक्ती करायला पाहिजे. ज्या डेअरी व खरेदीदारांकडून दूध खरेदी करताना लूट करण्यात येत आहे, अशा ठिकाणी तक्रारीकरिता हेल्पलाईन नंबर देण्यात यावे, अशी मागणीही पशुपालकांतून जोर धरत आहे. यामुळे दूध खरेदीत लूट थांबविण्यात मदतीचे ठरणार आहे. अन्न व औषधी प्रशासन विभागाने लिटरची तपासणी करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. परंतु, आजवर लिटरची साधी चौकशी करण्यात आली नसल्याचा आराेप होत आहे. चौकशीकरिता पथक तयार करण्यात आले नाही. शेतकरी व पशुपालकांकडून दूध खरेदीत लूट सुरू आहे. शेतकरी उघडपणे बोलत नसले तरी लिटरच्या छेडछाडमुळे दूध खरेदीत लूट होत असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे. प्रशासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची मागणी आहे.

Web Title: Alleged robbery of milk in purchase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.