फूटपाथ दुकानदारांना गाळे वाटप करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:38 AM2021-09-18T04:38:21+5:302021-09-18T04:38:21+5:30

गत दोन - तीन वर्षांपासून फूटपाथ दुकानदारांच्या आर्थिक उत्थानासाठी भंडारा नगर परिषदेने अंदाजे अडीचशे गाळ्याची निर्मिती केली; परंतु काही ...

Allocate space to sidewalk shoppers | फूटपाथ दुकानदारांना गाळे वाटप करा

फूटपाथ दुकानदारांना गाळे वाटप करा

googlenewsNext

गत दोन - तीन वर्षांपासून फूटपाथ दुकानदारांच्या आर्थिक उत्थानासाठी भंडारा नगर परिषदेने अंदाजे अडीचशे गाळ्याची निर्मिती केली; परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे फूटपाथ दुकानदारांना गाळ्याचे वितरण करण्यात आले नाही. हे गाळे मिस्किल टँक गार्डन व हुतात्मा स्मारक चौकात उभे ठेवण्यात आले आहेत. या गाळ्याकडे नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांचे लक्ष नसल्यामुळे अनेक व्यक्तींनी काही गाळ्यावर अतिक्रमण केले आहे. हे गाळे सध्यस्थितीत पडीक स्वरुपात निकामी व रिकामे पडले आहेत. भंडारेकराच्या करातून येणाऱ्या भांडवलाने या गाळ्याची निर्मिती करण्यात आली आहे. यातच हे गाळे लोखंडी असल्याने या गाळ्यावर गंज चढला आहे. पाहणी केल्यास गाळ्याच्या छतातून पाणी झिरपत असल्याचे आढळून आले आहे.

शिष्टमंडळात शहराध्यक्ष प्रशांत देशकर, इंटकचे जिल्हाध्यक्ष धनराज साठवणे, जिल्हा महासचिव महेंद्र वाहाणे, नगर परिषदेचे पक्षनेता शमीम शेख, नगरसेवक नितीन धकाते, महासचिव सोहेल अहमद, शहर महासचिव इम्रान पटेल, मेहमूद खान, शेख नवाब, सुरेश गोन्नाडे, पृथ्वीराज तांडेकर, रवींद्र थानथराटे, प्रीतम भोंडेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Allocate space to sidewalk shoppers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.