डाळ वाटपात सर्वसामान्यांना फटका
By Admin | Published: November 16, 2015 02:07 AM2015-11-16T02:07:31+5:302015-11-16T02:07:31+5:30
‘दाल रोटी खाओ, प्रभू के गुण गावों, असे गीत प्रचलित आहे. परंतु तूर डाळ आता श्रीमंतीचे लक्षण दिसत आहे.
वाढती महागाई : स्वस्त धान्य दुकानात १३० रुपये भाव
तुमसर : ‘दाल रोटी खाओ, प्रभू के गुण गावों, असे गीत प्रचलित आहे. परंतु तूर डाळ आता श्रीमंतीचे लक्षण दिसत आहे. शासकीय स्वस्त धान्य दुकानातून शासनाने डाळ उपलब्ध करुन दिली असली तरी ती प्रति किलोग्रॅम १३० अशी आहे. बाजारात डाळीची किंमत १५० किलोग्रॅम आहे. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानात सामान्य ग्राहकांनी डाळीकडे पाठ फिरविल्याचे चित्र दिसत आहे.
देश तथा राज्यात अचानक डाळीचे भाव वाढले, भाव कमी होण्याचे मार्ग बंद झाल्यासारखेच झाले. सणासुदीचे दिवस पुढे येऊ न ठेवले. शासनावर दबाव वाढल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांना डाळ उपलब्ध करुन देण्याचा निर्णय शासनाने घेतला.
सरकारी स्वस्त धान्य दुकानातून डाळ वितरीत करण्यात येईल अशी घोषणा शासनाने केली. या तूर डाळीची किंमत १३० रुपये किलो ग्रॅम इतकी ठेवली.
सामान्य ग्राहकांनी सणासुदीच्या दिवसात अर्धा ते एक किलो ग्रॅम एवढी डाळ खरेदी केली. बाजारात तूर डाळीची किंमत सध्या १५० रुपये किलोग्रॅम इतकी आहे. केवळ २० रुपयाचा येथे फरक आहे.
अनेक स्वस्त धान्य दुकानात सध्या तूर डाळीचा साठा उपलब्ध आहे. सर्वसामान्य गरिबांनी तांदूळ व गहू खरेदी केली. डाळ हा घटक अनिवार्य नाही अशा प्रतिक्रिया सर्वसामान्यांनी दिल्या.
जप्त केलेली तुर दाळ केवळ १०० रुपये प्रति किलोग्रॅम विक्री करण्यात आली. तीही केवळ शहरी भागात, परंतु ग्रामीण भागात आजही तुरदाळ चढ्या भावानेच विक्री केली जात आहे. पूर्व विदर्भात एकाही ठिकाणी साठा जप्त करण्यात आला नाही. अन्न पुरवठा विभागाने केवळ कागदोपत्री तपासणी केली असावी. शासन स्तरावर किमान स्वस्त धान्य दुकानातून ७० ते ८० रुपये किलोग्रॅम तुरडाळ सर्वसामान्यांना उपलब्ध करुन देण्याची गरज होती. दिवाळीसारख्या मोठया सणाला राज्य शासनाने स्वस्त धान्य दुकानातून डाळ उपलब्ध करुन दिली परंतु डाळीचा भाव जास्त आहे. सर्वसामान्यांना तो परवडणारा नाही. आपले स्वस्त धान्य दुकानात डाळीचा साठा जप्त आहे. (तालुका प्रतिनिधी)