देशसेवेसोबतच वृक्षसंवर्धनही गरजेचे आहे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:39 AM2021-08-28T04:39:05+5:302021-08-28T04:39:05+5:30
महा एनजीओ फेडरेशन व रामसागर ग्रामीण विकास बहूद्देशीय संस्था, सोनेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच आरोग्य विभाग भंडारा यांच्या सहकार्याने ...
महा एनजीओ फेडरेशन व रामसागर ग्रामीण विकास बहूद्देशीय संस्था, सोनेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच आरोग्य विभाग भंडारा यांच्या सहकार्याने राखी पौर्णिमेनिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या डीटीसी सेंटर येथे पर्यावरणपूरक बीज राखी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. पीयूष जक्कल, प्रमुख पाहुणे म्हणून महा एनजीओ फेडरेशनचे राज्य समन्वयक दिलीप बिसेन, रामसागर संस्थेचे किशोर ठवकर, पुष्पाली भगत, रूपाली बिसेन, प्राची रहांगडाले, डॉ. शुभम चेटुले, डॉ. राहुल कापगते, डॉ. सुधांशू वासनिक, डॉ. सुधीर चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
कोब्रा कमांडो बटालियन २०६, चितापूरचे प्रशिक्षणार्थी कमांडेट सुनीत वार्षणेय, कमांडो सुनील, छोटक, बुद्धेश्वर, लोकेश्वर, विनायक, गौरव, गोकूल, सुनील, गोपाल, नितेश, मुकेश, राकेश, नारायण, कम्मारवे, महाराजन यांच्यासह डॉक्टरांना यावेळी राखी बांधण्यात आली. यावेळी उपस्थित कमांडोंनी राखीचे बीज परिसरात किंवा कुंडीत रुजवून त्याचे संगोपन करू, असे आश्वासन दिले. बीजापासून होणारे रोपटे नेहमी बहिणीने दिलेल्या भेटवस्तूची आठवण देत राहील, असे सांगितले. कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष विशाल शेंडे, डॉ. पूनम सहारे, डॉ. प्रीती पवार, डॉ. मीनल पालेकर, उमेश जांगडे आदींनी सहकार्य केले.