शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव अग्रेसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:45 AM2021-02-25T04:45:29+5:302021-02-25T04:45:29+5:30
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, पवनीची सभा दुर्गा माता मंदिर, विठ्ठल गुजरी वॉर्ड येथे पार पडली. त्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते ...
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, पवनीची सभा दुर्गा माता मंदिर, विठ्ठल गुजरी वॉर्ड येथे पार पडली. त्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी जिल्हा सरचिटणीस सुधीर वाघमारे, शिक्षक सोसायटीचे अध्यक्ष संजीव बावनकर, उपाध्यक्ष रमेश काटेखाये, संचालक शंकर नखाते, जिल्हा कोषाध्यक्ष मुकेश मेश्राम, सुरेंद्र उके, बी.के. मेश्राम, रमेश लोणारे, जीवनप्रकाश काटेखाये, मनोहर बावनकर, दिगंबर जिभकाटे, रामरतन मोहुर्ले, प्रकाश अलोने, अनिल मरसकोल्हे, प्रीती कोचे, वैशाली देशमुख यांच्यासह जिल्हा कार्यकारिणी सदस्य व तालुका कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.
सभेच्या सुरुवातीला गत वर्षात कोरोनामुळे जीव गमावलेल्या शिक्षकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष दिगंबर जिभकाटे यांनी केले. यावेळी पवनी तालुक्यात आंतरजिल्हा बदलीने व नव्याने सेवेत रुजू झालेल्या शाहिद खान, अभय खंगार, सुनील आत्राम, अर्चना भेंडारकर, सत्यवान बावनगडे, वेणूताई गभणे, सुमित संगेल यांचा सत्कार करण्यात आला.
संजीव बावनकर यांनी आजपर्यंत कशा पद्धतीने संघटनेच्या माध्यमातून व वैयक्तिक पुढाकार घेऊन कशाप्रकारे शिक्षक बांधवांना न्याय मिळवून दिला याचा उदाहरणांसह लेखाजोखा सादर केला. तसेच भंडारा जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेतील कामकाजाविषयी व योजनांविषयी माहिती दिली.
संचालन उत्तम कुंभारगावे यांनी, तर आभार अनिल मरसकोल्हे यांनी केले. सभेला विनायक मंदुरकर, विश्वनाथ ठवकर, देवेंद्र हरडे, श्रीकृष्ण हाडगे, अशोक मेश्राम, विष्णू वीर, श्रावण दडमल, भागवत मोटघरे, विलास घोडेले, सुरेश आवारी, मूलचंद कोचे, बाळकृष्ण भुरे, सुखदेव नरुले, योगीराज बावनकर, विलास निखाडे, विकास खापर्डे, सुधाकर भानारकर, विलास राऊत, सोमेश्वर मस्के, भुजंग खाटीक, भीमराव आकरे, मोरेश्वर कुर्झेकर, दशरथ मोथारकर, सुकराम जनबंधू, रामकृष्ण मेहरकुरे, देवराम चकोले, सुरेंद्र रामटेके, प्रकाश कळंबे, मार्तंड गजघाटे, केशव नागपुरे, सत्यवान बावनगडे, प्रमोद जिभकाटे, उमेश खेडकर, गोवर्धन साठवणे, फत्तुलाल सोनकुसरे, बंडुभाऊ कुर्झेकर, गेमराज मानापुरे, पांडुरंग नखाते, रामरतन भुरे, प्रीती कोचे, वैशाली देशमुख, संगीता सोनकुसरे, ज्योती माकडे, सुनीता गाढवे, येनू गभने आदी उपस्थित होते. सभेसाठी सुधीर माकडे, राम पवार, राजू राठोड, किशोर धरमसारे, रमेश बलकार व प्रेम जाधव यांचे सहकार्य लाभले.