जिल्हाधिकाऱ्यांचा कक्ष नागरिकांसाठी सदैव उघडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2020 05:00 AM2020-10-03T05:00:00+5:302020-10-03T05:00:39+5:30
हिमाचल प्रदेश कॅडरचे अधिकारी असलेले संदीप कदम यांनी जिल्हाधिकारी पदाचे सुत्रे २१ ऑगस्ट रोजी हाती घेतली. मुळचे नाशिकचे असलेल्या अधिकारी रुजू झाल्यानंतर काहीच दिवसात महापूराची स्थिती होती. ही परिस्थिती अतिशय कुशलतेने हाताळत त्यांनी अगदी सुरुवातीपासून जनतेचा विश्वास संपदान करणे सुरु केले. जिल्ह्यात कोरोनाची स्थिती हाताबाहेर जाण्याच्या परिस्थितीत होती.
ज्ञानेश्वर मुंदे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : उच्चपदस्थ अधिकारी म्हटला की त्यांच्या कक्षाचे दार कायम बंद. अभ्यागतांना भेटण्यासाठी तासन्तास प्रतीक्षा करावी लागते. अनेक ठिकाणी तर अधिकाऱ्यांना भेटण्याची वेळही ठरलेले असतात. मात्र याला अपवाद आहेत भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी संदीप कदम. पदभार स्विकारला तेव्हापासून त्यांच्या कक्षाचे दार सदैव उघडे असते. येथे येणारा प्रत्येक व्यक्ती थेट जिल्हाधिकाऱ्यांना भेटू शकतो. लोकाभिमूख प्रशासनाच अनुभव जिल्हाधिकारी कार्यालयात येते.
हिमाचल प्रदेश कॅडरचे अधिकारी असलेले संदीप कदम यांनी जिल्हाधिकारी पदाचे सुत्रे २१ ऑगस्ट रोजी हाती घेतली. मुळचे नाशिकचे असलेल्या अधिकारी रुजू झाल्यानंतर काहीच दिवसात महापूराची स्थिती होती. ही परिस्थिती अतिशय कुशलतेने हाताळत त्यांनी अगदी सुरुवातीपासून जनतेचा विश्वास संपदान करणे सुरु केले. जिल्ह्यात कोरोनाची स्थिती हाताबाहेर जाण्याच्या परिस्थितीत होती. यावेळी शहरातील विविध सामाजिक संस्था आणि अधिकाऱ्यांच्या लागोपाठ बैठका घेवून जनतेमधील कोरोनाची भीती नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले. कोरोनाशी प्रशासनाचा लढा सुरु असतांनाच जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या कामाची अवघ्या दोन आठवड्यात छाप सोडली.
यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षचे दार सदैव बंद असायचे. येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला वेळ घेवूनच जिल्हाधिकाऱ्यांना भेटता येत होते. मात्र जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी आपल्या कक्षाचे दार कायम उघडे राहील अशी सूचना दिली. आता त्यांच्या कक्षाचे दार नेहमी उघडे असते.
जिल्हाधिकाºयांना आपल्या कक्षातील खुर्चीवरुन कोण आले आहे, हे दिसून येते. याठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाला भेटण्यांचा त्यांचा प्रयत्न असतो. अगदी आपुलकीने त्यांच्याशी संवाद साधून त्यांचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला जातो. जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एखादा उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या कक्षाचे दार नागरिकांसाठी उघडे राहत आहे. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांप्रती आपुलकीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोणत्याही अधिकाऱ्याच्या व्हिजीटींग टाईम असू नये. येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची भेट घेतलीच पाहिजे. एखादा व्यक्ती लांब अंतरावरुन पैसे खर्च करुन भेटण्यासाठी येतो. पंरतु अधिकारी भेटत नाही. त्यामुळे वेगळा संदेश जातो. यासाठीच आपण आपल्या कक्षाचे दार उघडे ठेवण्याची सूचना केली. यापूर्वी आपल्या बैठकीचे नियोजन गुगल कॅलेंडरवर प्रसिध्द केले जात होते. त्यामुळे नागरिक नियोजन करुन भेटण्यासाठी येत होते. येथील असाच प्रयोग केला जाईल. प्रत्येकाचा भेट घेण्याचा प्रयत्न राहील.
- संदीप कदम, जिल्हाधिकारी