आंबागड येथे तलावाच्या पाळीला पडले भगदाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2020 05:00 AM2020-05-08T05:00:00+5:302020-05-08T05:00:47+5:30

यासंबंधात गावकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार केली आहे. मात्र विभागाचे दुर्लक्ष कायम असल्याने याकडे विभागाचे लक्ष नाही. तुमसर तालुक्यातील जुना आंबागड येथील गावशिवाराजवळच मोठा प्राचीन तलाव आहे. या तलावात पाण्याचा वापर शेतकरी शेतीच्या सिंचनासाठी करतात. यापूर्वी तलावात फारसे पाणी येत नव्हते. मात्र बावनथडी प्रकल्प बनल्यापासून तलावात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा होत आहे.

At Ambagad, there was a rupture of the lake | आंबागड येथे तलावाच्या पाळीला पडले भगदाड

आंबागड येथे तलावाच्या पाळीला पडले भगदाड

Next
ठळक मुद्देलोकवस्तीला धोका वाढला : पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
आंधळगाव : मोहाडी तालुक्यातील रामपूर येथील जुना आंबागड तलाव जीर्ण झाल्याने तलावाच्या पाळीला मोठे भगदाड पडले असून तलाव फुटण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली आहे.
यासंबंधात गावकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार केली आहे. मात्र विभागाचे दुर्लक्ष कायम असल्याने याकडे विभागाचे लक्ष नाही. तुमसर तालुक्यातील जुना आंबागड येथील गावशिवाराजवळच मोठा प्राचीन तलाव आहे. या तलावात पाण्याचा वापर शेतकरी शेतीच्या सिंचनासाठी करतात. यापूर्वी तलावात फारसे पाणी येत नव्हते. मात्र बावनथडी प्रकल्प बनल्यापासून तलावात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा होत आहे. त्यामुळे सदैव पाण्याने काठोकाठ भरलेल्या या तलावाला धोका निर्माण झाला आहे. तलावाची पाळही जीर्ण झाल्याने याला अनेक ठिकठिकाणी भेगा पडल्या आहेत. ठिकठिकाणी या भेगांमधून पाणी वाहत असल्याने पाण्याचाही मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. या संबंधीची गावकऱ्यांनी अनेकदा पाटबंधारे विभागाकडे पत्रव्यवहार करून तक्रार केली. मात्र सदर तलाव आमच्याकडे येत नसल्याची उडवाउडवीची उत्तरे देत कर्मचाºयांनी दुरुस्तीसाठी टाळाटाळ केली. यानंतर गावकºयांनी स्वखर्चाने पाळीवर मुरुम घालून बुजविण्याचा प्रयत्न केला. पण गावातीलच एका तक्रारीनंतर हे काम अर्धवट राहिले. आजही या तलावातून पाण्याचा मोठा अपव्यय होत आहे. बावनथडी प्रकल्पाचे पाणी सुरु असल्याने तलावातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस वाढत आहे. तलावातून पाणी मोठ्या प्रमाणात वाहत असल्याने व तलावाला मोठे भगदाड पडल्याने तलावाच्या खालच्या भागातून आदिवासी बहुल ४८ कुटुंबाच्या लोकवस्तीला मोठा धोका निर्माण झाला आहे. येथे अनेक शेतकरी धानपिकाची लागवड करतात. त्यामुळे तलावाची पाळ फुटल्यास मानवी जीवीतहानीसह शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. त्यामुळे पाटबंधारे विभागाने वेळीच लक्ष देऊन तलावाच्या दुरुस्तीची मागणी ग्रामपंचायत सदस्य धर्मेंद्र इळपाचे यांच्यासह गावकºयांनी प्रशासनाकडे केली आहे.
 

Web Title: At Ambagad, there was a rupture of the lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.