समाज निर्मितीसाठी झटणारी ही आंबेडकरी जाणीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 10:30 PM2018-10-06T22:30:19+5:302018-10-06T22:30:37+5:30

सर्व बाजूंनी मिळणाऱ्या द्रव्याचे अंग घेऊनच सर्व सजीव -निर्जीव अस्तित्वांचे प्रकार उत्पन्न झाले आहेत. जगातील सर्व मानव आतून बाहेरून परस्परांशी अखंडितावस्थेत आहे.

Ambedkar realizes that he is trying to create a society | समाज निर्मितीसाठी झटणारी ही आंबेडकरी जाणीव

समाज निर्मितीसाठी झटणारी ही आंबेडकरी जाणीव

Next
ठळक मुद्देमा. प. थोरात : लाखनी येथे दुसरे आंबेडकरी साहित्य संमेलन, शहरातून काढला संविधान मार्च

चंदन मोटघरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : सर्व बाजूंनी मिळणाऱ्या द्रव्याचे अंग घेऊनच सर्व सजीव -निर्जीव अस्तित्वांचे प्रकार उत्पन्न झाले आहेत. जगातील सर्व मानव आतून बाहेरून परस्परांशी अखंडितावस्थेत आहे. सर्व मानवाला समान स्वातंत्र व समान न्याय असलाच पाहिजे. या सृृष्टीवर आधारलेला मानव समाज असायला पाहिजे, असे मानणारी व समाज निर्मितीसाठी झटणारी जावीव हीच आंबेडकरी जाणीव आहे, असे प्रतिपादन डॉ. मा. प. थोरात यांनी केले.
स्थानिक स्वप्नीदप सभागृहात दुसरे वैदर्भिय आंबेडकरी साहित्य संमेलन शनिवारपासून आयोजित करण्यात आले. यावेळी संमेलनाध्यक्ष म्हणून डॉ. थोरात बोलत होते. संमेलनाचे उद्घाटक म्हणून ई.झेड. खोब्रागडे संमेलनाचे पूर्वाध्यक्ष विजयकुमार गवई, संमेलनाध्यक्ष डॉ.मा.प. थोरात, स्वागताध्यक्ष ह.ध. बोरकर उपस्थित होते.
संमेलनानिमित्त महाप्रज्ञा बौद्ध विहारापासून संविधान मार्च काढण्यात आला. याप्रसंगी भगवान सुखदेवे यांचे धम्मपाठ, धर्मांतरित बौद्धांची संस्कृति आणि संस्कार व सी.एम. बागडे यांचे भीमा कोरेगावचे युद्ध अर्थात इतिहासाचे सोनेरे पान, डॉ.सुरेश खोब्रागडे यांचे वेळेवर येणारे इतर विषय, गजेंद्र गजभिये यांच्या सजग प्रहरी या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
प्रास्ताविक सी.एम. बागडे यांनी केले. संमेलनाची भूमिका अशोक बुरबुरे यांनी मांडली.
अध्यक्षीय भाषणात डॉ.थोरात यांनी आंबेडकर वाद हा स्वयंपूर्ण, स्वयंप्रकाशी आणि स्वतंत्र आहे. आस्वादकान, अभ्यासकात जागृत करण्याची क्षमता आंबेडकरी साहित्यात आहे, असेही ते म्हणाले. गांधीवाद आणि मार्क्सवादात अस्तित्वासंबंधीचा संपूर्ण बोध होतनाही. बुद्धाचा विचार स्वीकारणाºया आंबेडकरांच्या तत्वज्ञानात कालावकाशरहित अस्तित्व मांडलेले आहे. आणि या अस्तित्वाला सिद्ध करणाºया आधुनिक विज्ञानातील ज्ञानाच्या सहाय्याने मानव विश्वातील समता-बंधूता-स्वातंत्र-न्याय भावावर उभारलेल्या मानव समाजाची रचना अहिंसकपणे निर्माण केल्यानेच शोषणरहित मानव समाजाची निर्मिती डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराद्वारे करता येऊ शषते. असे विचारही त्यांनी व्यक्त केले. उद्घाटकीय कार्यक्रमाचे संचालन डॉ.सुरेश खोब्रागडे यांनी तर आभार प्रदर्शन भगवान सुखदेवे यांनी केले.

Web Title: Ambedkar realizes that he is trying to create a society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.