आंबेडकरी समाज जागृती संमेलन लवकरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 11:32 PM2017-08-28T23:32:29+5:302017-08-28T23:32:49+5:30

आंबेडकरी बांधवांच्या विविध प्रश्नांवर विचारविनिमय करुन निर्णय घेण्याकरिता भंडारा येथे आंबेडकरी समाजबांधवांची सभा आयोजित करण्यात आली.

Ambedkar Samaj Jagruti Sammelan soon | आंबेडकरी समाज जागृती संमेलन लवकरच

आंबेडकरी समाज जागृती संमेलन लवकरच

Next
ठळक मुद्देसर्वानुमते निर्णय : आंबेडकरी समाज बांधवांची सभा

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : आंबेडकरी बांधवांच्या विविध प्रश्नांवर विचारविनिमय करुन निर्णय घेण्याकरिता भंडारा येथे आंबेडकरी समाजबांधवांची सभा आयोजित करण्यात आली. सभेत प्रश्नांची सोडवणूक झाली नाही तर आॅक्टोबर शेवटच्या आठवड्यात भंडारा येथे जिल्हास्तरीय आंबेडकरी समाजजागृती संमेलन आयोजित करुन मागण्या मंजूर करुन घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
दलित मित्र समाज भूषण, सामाजिक कार्यकर्ते, विविध सामाजिक धार्मिक, राजकीय, शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रातील तसेच मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी व प्रतिनिधींच्या शेकडोची उपस्थिती असलेली ही संयुक्त सभा भंडारा येथील म्हाडा कॉलनीतील रामटेके सभागृहात माजी नगराध्यक्ष महेंद्र गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी तुमसरचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे जयप्रकाश भवसागर, भंडाराचे अमृत बन्सोड, प्रेमसागर गणवीर, डी. एफ. कोचे, म. दा. भोवते, रत्नमाला वैद्ये, रामचंद्र अंबादे, प्रेम सूर्यवंशी, बाळकृष्ण शेंडे, डी. व्ही. बारमाटे, इंजि. रुपचंद रामटेके, ज्ञानेश्वर गजभिये, एम. डब्ल्यू दहिवले, महादेव मेश्राम, डॉ. डी. आय. शहारे, गुलशन गजभिये, हिवराज उके, आर. ए. चिमणकर, बालकदास खोब्रागडे, असित बागडे, एम. आर. राऊत, प्रा. डॉ. के एल. देशपांडे, सारिका उके, पी. के. ठवरे, संजय बन्सोड, राहुल डोंगरे, मोरेश्वर बोरकर, अरुण गोंडाणे, प्रभाकर भोयर, डॉ. सुनील जीवनतारे, डॉ. भैयालाल गजभिये, आशु गोंडाणे, राजेश बौध्द, लक्ष्मीकांत तागडे, माया उके, डी. डी. रंगारी, करण रामटेके, सुरेश सतदेवे, अजय गडकरी, अजय तांबे, महेंद्र वहाणे, एम. एस. मेश्राम, नरेंद्र बन्सोड, विनोद रामटेके, शीलदीप गजभिये, यशवंत उपरीकर, सिध्दार्थ गजभिये, आहुजा डोंगरे आदी उपस्थित होते.
सरकारी व निमसरकारी इत्यादी नोकºयातील खुल्या जागेवर एससी, एनटी, ओबीसीच्या उमेदवारांना बंदी, या संवर्गातील कर्मचारी अधिकाºयांचे पदोन्नतीतील आरक्षण अवैध ठरविणे या गुजरात व मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुध्द मुदतीत पुनर्विचार याचिका/अपील दाखल करण्यास शासनास बाध्य करणे, अभियांत्रिकी, वैद्यकीय, व्यवसायीक आदी अभ्यासक्रमासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून प्रवेशाच्या वेळी सक्तीने फी वसुल करणाºया शिक्षण संस्थावर दंडात्मक व कडक कार्यवाही करणे, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलीडीटीच्या जाचक अटी रद्द करुन त्या मुदतीत मिळणे, युपीएससी व तत्सम परीक्षेत उत्तीर्ण होऊनही केंद्र सरकारच्या अनुसूचित जातीच्या यादीत बौध्दाचा समावेश नसल्याचे तांत्रिक कारण दर्शवून बुद्धिष्ट उमेदवारांची नियुक्ती न करणे किंवा केलेली नियुक्ती रद्द करण्यात येत असल्यामुळे केंद्र सरकारच्या अनुसूचित जातीच्या यादीत क्रमांक ६० वर बौध्द / नवबौध्द असे नमूद करणे, मागासवर्गीयांचा नोकºयातील लाखोंचा अनुशेष भरणे, खाजगी क्षेत्रात नोकºयात आरक्षण लागु करणे, वैद्यकीय अभ्यासक्रमात मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्राशिवाय हमीपत्रावर मिळालेल्या प्रवेशात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीवर सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करणे, प्रलंबित बुद्धिष्ट पर्सनल लॉ मंजूर करणे, पवनी येथील उत्खननात सापडलेल्या अवशेषांचे जतन करुन उर्वरित दोन स्थळांचे उत्खनन करणे, भंडारा येथील १९५४ च्या पोट निवडणुकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेल्या तत्कालीन कोलते यांच्या व आताच्या अशोक ले लँडच्या रेस्टहाऊस या ऐतिहासिक स्थळाला बाबासाहेबांचे स्मारक म्हणून घोषित करणे आदी ज्वलंत प्रश्नावर विचारविनिमय करुन निर्णय घेण्याकरिता सभेचे आयोजन करण्यात आले होते.
सभेत जिल्हास्तरीय आंबेडकरी समाजजागृती संमेलन आयोजित करण्यचा निर्णय घेण्यात आला. हे आबेडकरी समाजजागृती संमेलन दिवसभराचे राहणार असून सकाळच्या उद्घाटनाच्या सत्रानंतर चार ज्वलंत विषयावर चार तज्ञांचे चर्चासत्र होणार आहे. त्यात माजी न्यायाधीश अनिल वैद्य, माजी न्यायाधीश कोळसे पाटील, न्यायमुर्ती सी. एल. थुल, घटनातज्ञ प्रा. देवीदास घोडेस्वार यांना आमंत्रित करण्याचे ठरविण्यात आले आहे. याकरिता एक समिती गठित करण्यात आली आहे.
प्रास्ताविक व संचालन संयोजक अमृत बन्सोड यांनी केले. आभार असित बागडे यांनी मानले.

Web Title: Ambedkar Samaj Jagruti Sammelan soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.