अन् भाऊबीजेला बहिणीच्या नात्याची वीण तुटली

By admin | Published: November 2, 2016 12:44 AM2016-11-02T00:44:06+5:302016-11-02T00:44:06+5:30

भावाच्या प्रगतीसह त्याच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करणारी बहीण. प्रेमभावनेने करणारी ओवाळणी व औक्षणाचा ....

And brother-in-law's brother's relationship is broken | अन् भाऊबीजेला बहिणीच्या नात्याची वीण तुटली

अन् भाऊबीजेला बहिणीच्या नात्याची वीण तुटली

Next

पोलीस दलात जाण्याचे स्वप्न राहिले अपुरे : ट्रकने दिली होती धडक, उपचारादरम्यान सोडला श्वास
मोहाडी : भावाच्या प्रगतीसह त्याच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करणारी बहीण. प्रेमभावनेने करणारी ओवाळणी व औक्षणाचा पारंपरिक भाऊबिजेच्या उत्सवालाच धाकट्या बहिणीची वीण तुटून पडली. भाऊबिजेला असा दुदैवी क्षण बहिणीच्या वाट्याला आली. आज भाऊ बिजेला भावाचे अखेरचे औक्षण करण्याचा दु:खद प्रसंग बहिणीच्या नशिबी आल्याची घटना बोथली या गावी घडली.
'सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती
ओवाळीते भाऊराया, वेड्या बहिणीची माया'
या गीताप्रमाणे दिवाळीतील भाऊबीज म्हणजे बहीण-भावाचा नात्याची वीण घट्ट करणारा सण. पण, या सणाच्याच दिवशी परलोकी गेलेल्या भावाला साश्रूनयनांनी बहिणीला ओवाळणी घालण्याचा हृदयद्रावक प्रसंग ओढवला आहे. बोथली येथील प्रभू कुकडे यांचा लहान कुटूंब, एक मुलगा मुलगी असा परिवार. अतिशय सामान्य कुटूंबात जन्मलेला आचल लहानपणापासून हुशार होता. शिक्षक बनण्याचे स्वप्न बघत तो बेरोजगार झाला. पण, तो खचला नाही.
आपल्या कुटूंबाचा आधारवड होण्याची तीव्र जीद्द त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. त्याने डी.एड., बी.एड., बी.ए., आयटीआयचे शिक्षण पूर्ण केले. नोकरीच्या शोधासाठी तो दररोज वर्तमानपत्र वाचायचा. असाच नित्याप्रमाणे २३ आॅक्टोबर रोजी भडके यांच्या पानटपरीवर वर्तमानपत्र वाचत होता. सर्व लक्ष वर्तमानपत्र वाचनात केंद्रीत करणाऱ्या आचलला माहित नव्हते काळ आपल्यासमोर येईल. तुमसरकडून येणारा एक ट्रक भडके यांच्या पानटपरीत शिरला.
जी लोक रिकामी बसली होती ती पळून गेली. मात्र वर्तमानपत्र वाचणाच्या धुंदीत असणाऱ्या आचलला काही कळण्याआधी ट्रकने धडक दिली. त्याच्या पाय व डोक्याला जबर दुखापत झाली. त्याला नागपूर येथे एका खाजगी रूग्णालयात नेण्यात आले. त्याच्या डोक्याची व पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
आठवड्यापासून त्याच्यावर उपचार सुरूच होता. अखेर मात्र जीवन मृत्यूच्या झुंजीत आज पहाटे त्याची प्राणज्योत मालवली.
२६ वर्षीय आचल हा आपल्या भावी आयुष्याचे रंगवित होता. आपल्या कुटूंबाच्या सुखासाठी नोकरी मिळविलीच पाहिजे, असा त्याने निश्चय केला होता. शिक्षकाच्या नोकर भरतीवर असलेली बंदीमुळे तो दुसऱ्या क्षेत्राकडे वळला. त्याने पोलीस दलात जाण्यासाठी भंडारा येथे शिकवणी लावली होती. स्वकर्तृत्वाने पोलीस बनण्याचे स्वप्न बघत असताना त्याच्या नशिबी दुर्देव आले. त्याच्यावर रूग्णालयात महागडे उपचार झाले. पण, तो परत सामान्य स्थितीत येण्यासाठी झुंजला... अखेर तो जीवनाच्या या प्रवासात हरला. अन् भाऊबीजेच्या दिवशी त्याचे स्वप्ने मातीमोल ठरले.
भावा-बहिणीचे अतूट नाते व प्रेमसंवर्धन करण्याचा भाऊबिजेच्या दिवशी बहिणीला अखेरचे निशब्द ओवाळणी करण्याचा दिवस बघावा लागला. जीवनात आधार देणारा, सोबत चालणारी, योग्य दिशा व मार्ग दाखविणारा, दु:खात सहभागी होणारा सुखात सामावून घेणारा व गरीबीत लढण्याचे सामर्थ्य देणारा बहिणीचा थोरला भाऊ औक्षण व ओवाळणी करण्याच्या दिवशीच परलोकाच्या स्वाधीन झाला. धाकट्या बहिणीच्या मायेचा वीण भाऊबिजेलाच तुटावी, यापेक्षा दुदैवी प्रसंग आणखी कोणता असू शकेल.
आचल कुकडेच्या जाण्याने कुकडे कुटूंबात निर्माण होणारा आधारवडच कायमचा कोमजल्याने गावात शोककळा पसरली आहे. प्रभू कुकडे यांची लेक नागपूर येथे एमएससी करीत आहे. आचलची बहीणच आता आई-वडिलांची छत्रछाया बनणार आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: And brother-in-law's brother's relationship is broken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.