अन् नगरपरिषदने मिळवून दिला स्वयंरोजगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2018 10:23 PM2018-08-05T22:23:01+5:302018-08-05T22:23:55+5:30
स्वयंरोजगाराबद्दल केवळ भाषणापुरते धन्यता न मानता प्रत्यक्ष कृतीत उतरवून नगराध्यक्ष प्रदीप पडोळेनी शहरातील बीपीएल धारकांना आॅटो रिक्शाचा लाभ देवून स्वयंरोजगार मिळवून दिला आहे.
राहुल भुतांगे।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : स्वयंरोजगाराबद्दल केवळ भाषणापुरते धन्यता न मानता प्रत्यक्ष कृतीत उतरवून नगराध्यक्ष प्रदीप पडोळेनी शहरातील बीपीएल धारकांना आॅटो रिक्शाचा लाभ देवून स्वयंरोजगार मिळवून दिला आहे.
साधारणत: मागील दोन अडीच दशकात तुमसर शहर व तालुक्यातील छोटे मोठे उद्योग बंद पडले आहे. परिणामी रोजगाराच्या मोठ्या संधी शहरातून गेल्या. नवीन एकही उद्योग शहरात आला नाही. त्यामुळे रोजगार तसेच व्यापाऱ्यावर विपरित परिणाम दिसून आल्याने एकेकाळी कुबेराची नगरी म्हणून नावारुपास आलेल्या तुमसर शहराला ग्रहणच लागले आहे. खितपत पडलेल्या दारिद्र्य रेषेखालील लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी पुढाकार घेतला. न.प. च्या माध्यमातून कौशल्य विकासाचे धडे गिरवत शहरातील अनेक बेरोजगार युवकांना त्यांनी रोजगार मिळवून दिला. काहींना ते शिक्षणासाठी पुढकारानेही स्वखर्चातून आर्थिक मदतही करीत आहेत. परंतु त्याने साध्य होणार नाही. ही भावना मनात बाळगून नागरिकांना वमहिलांना स्वयंरोजगारासाठी प्रेरित करून बँकांच्या माध्यमातून कर्ज अनेकांना मिळवून दिले. स्वयंरोजगारातून रोजगाराची प्राप्ती व्हावी, यासाठी पडोळे वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून दारिद्र्य रेषेखालील येत असलेल्या शहरातील भोलेनाथ मानवटकर, रविकांत भोगे, खेमराज भोंगाडे,नामदेव धारंगे, महेश साठवणे, हिफजुल कुरैशी या लाभार्थ्याला नवीन आॅटो रिक्शा उपलब्ध करवून देवून त्यांना स्वयंरोजगार मिळवून दिला आहे. सहाही लाभार्थ्यांना एकाच वेळी न.प. च्या प्रांगणात आॅटो रिक्शा वितरित करण्यात आले. त्यावेळी सभापती तारा गभणे, मुख्याधिकारी अर्चना मेंढे, नगरसेवक श्याम धुर्वे, रजनिश लांजेवार, सलाम तुरक, किशोर भवसागर, राजू गायधने, गीता कोंडेवार, शिला डोये व न.प. कर्मचाऱ्यांसह असंख्य नगरवासी हा सोहळा पाहण्यासाठी उपस्थित होते.
शासनाच्या योजनेचा लाभ तळागाळातील लोकापर्यंत पोहचवून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे हेच मानस आहे.
-प्रदीप पडोळे
नगराध्यक्ष, तुमसर