अन् अधिकाऱ्यांची धावपळ सुरु

By admin | Published: April 11, 2017 12:41 AM2017-04-11T00:41:02+5:302017-04-11T00:41:02+5:30

कारधा - खमारी, कारधा - दवडीपार या मार्गावरील वृक्षांची विना परवानगी तोड करण्यात आली.

And the officers started running | अन् अधिकाऱ्यांची धावपळ सुरु

अन् अधिकाऱ्यांची धावपळ सुरु

Next

प्रकरण वृक्षतोडीचे : अधिकाऱ्यांची नागपुरवारी
भंडारा : कारधा - खमारी, कारधा - दवडीपार या मार्गावरील वृक्षांची विना परवानगी तोड करण्यात आली. यात शासकीय नियम बाजूला ठेवून हा सर्व प्रकार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याने केल्याची बाब ‘लोकमत’ने लावून धरली आहे. आज ‘त्या वृक्षकटाईच्या चौकशीचे आदेश धडकले’. या आशयाचे वृत्त प्रकाशित होताच बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची धावपळ सुरु झाली आहे. कार्यकारी अभियंता यांना तातडीने नागपुरला बोलाविण्यात आले.
रहदारीला वृक्षांचा अडथळा निर्माण होत असल्याचे कारण पुढे करून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय कार्यालयाचे उपअभियंता पी.पी. ठमके यांनी कारधा - खमारी, कारधा - दवडीपार या मार्गावरील प्रत्येकी सुमारे २ कि.मी. अंतरावरील वृक्षांची कत्तल केली. ही सर्व नियमबाह्य करण्यात आली आहे. वृक्षकटाई करण्यासाठी वनविभागाची परवानगी घेतली नसल्याची बाब आता वनविभागानेही व्यक्त केली आहे. सदर प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय शहारे यांनी वनमंत्री व बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता व अधीक्षक अभियंता यांच्याकडे तक्रार केली होती. या प्रकरणी मुख्य अभियंता यांनी चौकशीचे आदेश दिले आहे. वृक्षकटाईच्या चौकशीचे आदेश या आशयाचे वृत्त आज ‘लोकमत’ने प्रकाशित केले. या वृत्तामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. वृत्त प्रकाशनाने नागपूर येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भंडारा सार्वनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल येरकड यांना तातडीने नागपुरला बोलाविण्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणात बांधकाम विभागाचे अनेक अधिकारी गळाला लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (शहर प्रतिनिधी)

निविदा न काढताच वृक्ष कटाई
सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यालगतच्या वृक्षांची कटाई केली. तत्पूर्वी त्यांनी वृक्षांचे सीमांकन करून त्या संबंधात निविदा प्रकाशित करणे गरजेचे होते. मात्र तसे न करता मर्जीतील ठेकेदाराला वृक्षकटाईचे परस्पर आदेश दिल्याचीही गंभीर बाब आता समोर आली आहे. शासकीय मालमत्तेचे या अधिकाऱ्यांनी नुकसान केले आहे. बांधकाम विभागाने निविदा मागवून सहभागी कंत्राटदारांकडून वृक्षकटाईचे दरपत्रक घेणे गरजेचे होते. मात्र या सर्व बाबीला टाळून वृक्षकटाई करण्यात आल्याची गंभीर बाब आता उघडकीस आली आहे.

Web Title: And the officers started running

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.