अन् बँकेत चोरीचा प्रयत्न फसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 10:20 PM2018-08-06T22:20:32+5:302018-08-06T22:20:56+5:30

साकोली तालुक्यातील एकोडी येथे स्टेट बँकमध्ये रविवारच्या रात्री चोरट्यांनी चोरी करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. येथील बाजार चौकात एस.बी.आय. बँक असून स्टेट बँकेचा एटीएम सुद्धा आहे. हा संपूर्ण परिसर गर्दीचा असून येथून ग्रामस्थ ये-जा करीत असतात.

And the stolen attempt at the bank is unsuccessful | अन् बँकेत चोरीचा प्रयत्न फसला

अन् बँकेत चोरीचा प्रयत्न फसला

Next
ठळक मुद्देएकोडी येथील स्टेट बँकेतील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्क
एकोडी : साकोली तालुक्यातील एकोडी येथे स्टेट बँकमध्ये रविवारच्या रात्री चोरट्यांनी चोरी करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. येथील बाजार चौकात एस.बी.आय. बँक असून स्टेट बँकेचा एटीएम सुद्धा आहे. हा संपूर्ण परिसर गर्दीचा असून येथून ग्रामस्थ ये-जा करीत असतात.
घटनेच्या रात्री चोरट्यांनी बँकेलगत असलैल्या जि.प. हायस्कूलच्या मागच्या बाजुने बँकेतील भिंतीला भगदाड पाडून बँकेत प्रवेश केला. चोरट्यांनी अगोदरच सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे केबल वायरकापले. त्यामुळे बँकेतील कॅमेरे बंद पडले. चोरट्यांनी भिंत फोडून व तिजोरी रूममध्ये प्रवेश केला. परंतु खुप प्रयत्न करूनही तिजोरी उघडण्यात चोरांना अपयश आले. त्यांनी बँकेच्या मुख्य प्रवेश द्वाराचे कुलूप फोडले. एटीएम मशीनमध्ये जाऊन एटीएम मशीनची तोडफोड केली. परंतु मशीनमधून चोरट्यांना पैसे काढता आले नाही. शेवटी चोरट्यांनी जनरेटर रूमचा कुलूप फोडून त्यामध्ये एटीएम मशीनचा टपरा नेवून फेकला. उल्लेखनीय म्हणजे, ही बँक पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर आहे.
सकाळी येथील ग्रामस्थ जागे झाल्यावर हा संपूर्ण प्रकार त्यांच्या लक्षात आला. बँकेत कंत्राटी पदावर काम करणार व्यक्ती कोल्हे यांनी घडलेला प्रकार शाखा व्यवस्थापक वसंता मेश्राम यांना भ्रमणध्वनी वरून कळविला.
वसंता मेश्राम यांनी पोलीस पथकाला सुचना देऊन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलीस निरीक्षक पिपरेवार, उपनिरीक्षक रायपुरे, एलसीबी पथकाचे मानकर यांचे श्वान पथक, फिंगर प्रिंट आदी पथकाद्वारे शोध मोहिम सुरू करण्यात आली.
पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह
येथील बाजार चौकात असलेल्या स्टेट बँकमध्ये जी चोरीची दुर्देवी घटना घडली त्याच इमारतीत येथील पोलिस चौकी आहे. म्हणजेच शेजारची बँकेत चोरी होते व याला लागूनच असलेल्या पोलीस प्रशासनाला त्यावेळी काहीच जाग येत नाही. यावरून पोलिसांच्या कर्तव्य निष्ठेवर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.

रविवारच्या रात्री झालेल्या या प्रकारात रूपयांची चोरी झाली नसली तरी इतर किरकोळ नुकसान झाले आहे.
-वसंता मेश्राम,व्यवस्थापक, स्टेट बँक, एकोडी.

Web Title: And the stolen attempt at the bank is unsuccessful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.