अन् मुलासमक्ष वडिलांनी घेतली वैनगंगेत उडी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2023 11:49 AM2023-11-09T11:49:59+5:302023-11-09T11:50:30+5:30
बुडून झाला मृत्यू : वाचविण्याचे प्रयत्नही ठरले निष्फळ
भंडारा : मुलादेखत वडिलांनी नदीत उडी घेतली. यात मुलासह त्याच्या मित्राने वडिलांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्यात बुडाल्याने मुलादेखत वडिलांचा जीव गेला. अरविंद हरिदास राऊत रा. राजेंद्र वॉर्ड, भंडारा असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
ही घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास वैनगंगा नदीपात्रात घडली. अरविंद राऊत यांनी वैनगंगेत उडी घेतली. या वेळी त्यांचा मुलगा शशांक राऊत व त्याचा मित्र विलास बोरकर हे उपस्थित होते. शशांकने बाबाला वाचवण्यासाठी प्रयत्न केले, मात्र प्रयत्नही निष्फळ ठरले. पाण्याखाली बुडाल्याने अरविंद राऊत यांचा मृत्यू झाला. याची माहिती पोलिसांना देण्यात आली.
पोलिसांनी मदत मागून स्थानिक गोताखोरांच्या मदतीने वैनगंगा नदीपात्रातून मृतदेहाचा शोध घेतला. मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढून उत्तरीय तपासासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. अरविंद राऊत यांनी वैनगंगेत उडी घेऊन आत्महत्या का केली, याचे नेमके कारण मात्र कळू शकले नाही. भंडारा पोलिसांनी भादंविच्या १७४ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस नाईक वंजारी करीत आहेत.
क्षणात संपले सारे
वडिलांनी मुलादेखत वैनगंगा नदीत उडी घेतली. मुलाचा जीव कासाविस झाला. मित्रासह वडिलांना वाचविण्याचा अतोनात प्रयत्न केला. मात्र, वैनगंगेच्या अथांग पाण्यासमोर मुलगा आणि मित्राचे प्रयत्न व्यर्थ्य गेले. क्षणात सर्वकाही संपले.