जिल्हा परिषदेसमोर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आंंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:39 AM2021-08-13T04:39:57+5:302021-08-13T04:39:57+5:30
शासनाने दिलेले मोबाइल व पोषण ट्रॅकरबाबत जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा कुरसंगे, प्रकल्प अधिकारी राहुल निपसे, परसमोडे ...
शासनाने दिलेले मोबाइल व पोषण ट्रॅकरबाबत जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा कुरसंगे, प्रकल्प अधिकारी राहुल निपसे, परसमोडे यांनी आंदोलनस्थळी येऊन निवेदन स्वीकारले.
आंदोलनाचे नेतृत्व आयटक राज्य उपाध्यक्ष दिलीप उटाणे, राज्य सहसचिव रेखा कोहाड, जिल्हाध्यक्ष सविता लुटे, जिल्हा कार्याध्यक्ष हिवराज उके, मंगला गजभिये, रिता लोखडे, मंगला रंगारी, रेखा टेभुर्णे, छाया क्षिरसागर, मंगला गभने, शम्मीम बानो, जयनंदा कांबळे यांनी केले.
शासनाने १६ ऑगस्टपर्यंत योग्य निर्णय घेतले नाही तर १७ ऑगस्टपासून राज्यव्यापी मोबाइल वापसी आंदोलन व पोषण ट्रॅकर कामबंद करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला. शासनाने दिलेल्या जुन्या मोबाइलची सध्याची परिस्थिती वाईट आहे. त्याची वॉरंटी संपली आहे. हँग होतो, गरम होतो, बंद पडतो. नादुरुस्त होतो, दुरुस्तीचा खर्च प्रचंड येतो, तो अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून वसूल केला जातो, त्यात नवीन ॲप डाऊनलोड करण्यासाठी जागा शिल्लक नाही. त्याची क्षमता कमी आहे. कॅस हा चांगल्या प्रकारे चाललेला ॲप बंद करून त्याऐवजी केंद्र शासनाने लादलेल्या पोषण ट्रॅकर या सदोष ॲपबाबतीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अनेक प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. आयटक व अंगणवाडी कृती समितीने त्याबाबतीत शासनाला वेळोवेळी निवेदन पाठवले. परंतु त्याची पुरेशी दखल घेतली गेली नाही. यावेळी सीमा क्षिरसागर, सुनंदा बडवाईक, गौतमी धवसे, रूपलता वंजारी, ललिता देवतारे, लक्ष्मी ठाकरे, विजया काळे, ललिता देशमुख, लीलावती बडोले, अनिता घोडिचोरे, शम्मीम बानो, वंदना बघेले, आशा अवसरे, मंगला लोखंडे, कुंदा भदाडे, दीपा पडोळे, चंदा मडामे, शोभा ताईतकर, मंगला देशमुख, सुनंदा हेडावू, लहानाबाई राजूरकर, शालिनी तुमसरे, विजया काळे, मनीषा गणवीर, देवागणा शेंडे, उज्ज्वला रामटेके, मनोरमा हलमारे, तसेच आयटकवर्धिनी संघटनेच्या जिल्हा अध्यक्षा सुनीता मोहनकर आदी महिला सहभागी होत्या.