अंगणवाडी कर्मचाºयांचा जि.प.वर हल्लाबोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 10:26 PM2017-09-15T22:26:03+5:302017-09-15T22:26:36+5:30
अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे थकीत मानधन व निवृत्तीवेतन मिळावे यासाठी जिल्ह्यातील शेकडो अंगणवाडी कर्मचाºयांनी आज जिल्हा परिषदेवर हल्लाबोल केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे थकीत मानधन व निवृत्तीवेतन मिळावे यासाठी जिल्ह्यातील शेकडो अंगणवाडी कर्मचाºयांनी आज जिल्हा परिषदेवर हल्लाबोल केला. दरम्यान मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्या कक्षासह महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या कक्षासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाची प्रचंड तारांबळ उडाली.
चिमुकल्यांना शिक्षणाचे प्राथमिक विर्द्याजन देवून भावी नागरिक घडविण्यासाठी मेहनत घेणाºया अंगणवाडी कर्मचाºयांकडे प्रशासनाचे नेहमीच दुर्लक्ष करीत आहे. अंगणवाडी मदतनीस व सेविकांच्या प्रलंबित मागण्यांसदर्भात प्रशासनाशी अनेकदा पत्रव्यवहार केला. वेळप्रसंगी मोर्चा, धरणे देवून आंदोलने करण्यात आली. मात्र प्रशासनाने या महिला कर्मचाºयांच्या आंदोलनाची केवळ आश्वासनापूर्तीच दखल घेतली. त्यानंतर मात्र प्रलंबित प्रश्न सोडविण्याऐवजी ते जैसे थे स्थितीत आहेत. प्रशासनाकडे हक्काची बाजू मांडल्यानंतरही त्यावर तोडगा निघत नसल्याने जिल्ह्यातील संतप्त शेकडो अंगणवाडी कर्मचाºयांनी आज जिल्हा परिषदवर हल्लाबोल केला. महाराष्टÑ राज्य अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियन (आयटक)च्या माध्यमातून हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व राज्य कार्याध्यक्ष दिलीप उटाणे यांनी केले. विविध प्रलंबित मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या मोर्च्याचे रुपांतर ठिय्या आंदोलनात करण्यात आले. जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी यांच्या कक्षासह महिला व बाल विकास प्रकल्प विभागाचे उपमुख्य कार्यपालन अधिकारी यांच्या कक्षासमोरी वºहांड्यात शेकडो महिलांनी ठिय्या आंदोलन केले. सुमारे तासभर हा प्रकार सुरु होता. ठिय्या आंदोलनामुळे जिल्हा परिषद प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले.
जिल्हाधिकाºयांनी केली मध्यस्थी
जिल्हाधिकारी सुहास दिवसे हे एका शासकीय कार्यक्रमाकरिता जिल्हा परिषदमध्ये आले होते. यावेळी मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्या कक्षासमोर महिलांनी ठिय्या आंदोलन केल्याने जिल्हाधिकारी दिवसे यांनी सीईओ सुर्यवंशी यांना महिलांची समस्या विचारली यावेळी महिलांचे मागील अनेक महिन्यांपासून मानधन व काहींचे निवृत्तीवेतन प्रलंबित असल्याची माहिती मिळाली. यावर जिल्हाधिकारी यांनी तातडीने महिलांचे थकीत मानधन देण्याची निर्देश सीईओ यांना दिले.
या मागण्यांचा समावेश
दोन वर्षांपुर्वी मृत्यू पावलेल्या, राजीनामा दिलेल्या व सेवानिवृत्त झालेल्या अंगणवाडी कर्मचाºयांना सेवानिवृत्ती लाभ मिळावा, अंगणवाडी केंद्राची वेळ निश्चित करावी, लाईन लिस्टींगच्या नावाने करण्यात येणारी पैसाची वसुली बंद करावी, थकीत प्रवास भत्ता कर्मचाºयांना देण्यात यावा, जनश्री विमा योजनेची अंमलबजावणी करावी, मिनी अंगणवाडी केंद्राची मोठा अंगणवाडी केंद्रात रुपांतरीत करावे, अंगणवाडी कर्मचाºयांना पंचवार्षिक लाभ मिळावा, नियमबाह्य बदल्या व पदोन्नती रद्द कराव्या, सादील खर्च सेविकाना दयावे, रजिस्टर प्रशिक्षण चार दिवसांचे घ्यावे आदी मागण्यांचा समावेश होता.