अंगणवाडी कर्मचाºयांनी केली ‘जीआर’ची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 11:31 PM2017-09-23T23:31:17+5:302017-09-23T23:31:34+5:30

अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्यावतीने शनिवारी शासन मानधन वाढ संबंधीच्या काळ्या जीआरची होळी करण्यात आली.

Anganwadi workers have done 'GR' Holi | अंगणवाडी कर्मचाºयांनी केली ‘जीआर’ची होळी

अंगणवाडी कर्मचाºयांनी केली ‘जीआर’ची होळी

Next
ठळक मुद्देशासनाच्या काळ्या जीआरची होळी करण्यात आली

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्यावतीने शनिवारी शासन मानधन वाढ संबंधीच्या काळ्या जीआरची होळी करण्यात आली.
२ लाख अंगणवाडी कर्मचारी ११ सप्टेंबरपासून माधनवाढ आणि विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी बेमुदत संपावर आहेत. शासनाने अंगणवाडी कर्मचाºयांच्या मानधनवाढी संबंधात खोट्या संघटनेसोबत चर्चा करून मानधन वाढीचा खोटा आदेश काढून संप फोडण्याचा काम शासनाने केला असल्याच्या निषेधार्थ शासनाच्या काळ्या जीआरची होळी करण्यात आली. आज बावणे कुणबी समाज सभागृहात सविता लुटे, किसनाबाई भानारकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्याची सभा घेण्यात आली. सभेला अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे राज्य नियंत्रक आयटक नेते दिलीप उटाणे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. या सभेत २७ सप्टेंबर रोजी मुंबई मोर्चात जाण्याचा निर्णय झाला. शासनाने अंगणवाडी कर्मचाºयांना तुटपुंजी मानधनवाढ करून अंगणवाडी कर्मचाºयांची थट्टा केली. त्यामुळे अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने संप सुरु ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे.
या संप काळात अंगणवाडीची चाबी देणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला. अंगणवाडी केंद्राचे जबरदस्तीने ताले किंवा कुलूप तोडल्यास त्याची तक्रार पोलिसात करण्यात येईल व काही कमी जास्त झाल्यास त्याला कुलूप तोडणारेच जबाबदार राहतील असाही निर्णय घेण्यात आला. याप्रसंगी कार्याध्यक्ष हिवराज उके, उपाध्यक्ष मंगला गजभिये, सचिव अल्का बोरकर, शोभा ताईतकर, लहानाबाई राजूरकर, सुनंदा बडवाईक, मंगला रामटेके, गौतमी मंडपे, रेखा टेंभुर्णे, शमीमबानो खान, विजया काळे, पूजा भाजीपाले, छाया क्षीरसागर, निर्मला बावनकर, रेखा बोंद्रे, छाया गजभिये, किरण मस्के, लिलावती बडोले, प्रमिला बागडे, सुनंदा चौधरी, वंदना पशिने, छाया गजभिये, मोहिनी लांजेवार, वंदना बघेले, सदानंद इलमे आदी पदाधिकाºयांनी मार्गदर्शन केले.
सभा संपल्यानंतर अंगणवाडी कर्मचाºयांनी खा.प्रफुल पटेल यांची भेट घेऊन अंगणवाडी कर्मचाºयांच्या प्रश्नाबाबत चर्चा केली. संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शिवकुमार गणवीर, जिल्हा सचिव राजू बडोले यांनी अंगणवाडी कर्मचारी संपाला पाठींबा जाहीर करून आशा व गटप्रवर्तक यांनी पोषण आहाराचे काम करू नये असे आवाहन केले. कारण आशा व अंगणवाडी कर्मचाºयांचे प्रश्न सारखेच आहेत. आशांना शासनाने ५००० रूपये मानधन देण्याचे मान्य केले होते. पण अजून मानधनात वाढ दिली नाही. अंगणवाडी कर्मचाºयांच्या पदाधिकाºयांनी शासनाच्या चुकीच्या मानधनवाढीच्या काळ्या जीआरची होळी करण्यात आली. सभेचे अल्का बोरकर यांनी तर आभारप्रदर्शन हिवराज उके यांनी केले.

Web Title: Anganwadi workers have done 'GR' Holi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.