पवनी पोलिसांना बांधली अंगणवाडी सेविकांनी राखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:39 AM2021-08-28T04:39:50+5:302021-08-28T04:39:50+5:30
पोलिसांची नोकरी जनतेचे कायदेशीर संरक्षण करण्याची असून कर्तव्यावर असताना व्यस्ततेमुळे जबाबदारी झटकून सण उत्सव साजरे करण्यापासून वंचित ठेवते. कोविडच्या ...
पोलिसांची नोकरी जनतेचे कायदेशीर संरक्षण करण्याची असून कर्तव्यावर असताना व्यस्ततेमुळे जबाबदारी झटकून सण उत्सव साजरे करण्यापासून वंचित ठेवते. कोविडच्या पार्श्वभूमीवर कोरोना योद्धाची भूमिका सातत्याने पोलीसच निभावित आहेत. अशावेळी एकात्मिक बाल विकास योजना प्रकल्पाच्या महिलांनी पोलिसांना राखी बांधून महिलांच्याप्रति असलेल्या पोलिसाच्या जबाबदारीची आठवण व त्यांच्या कार्याचा गौरव केला.
याप्रसंगी पवनीचे ठाणेदार जगदीश गायकवाड यांनी महिलांचे संरक्षण व कायदे यांची माहिती दिली. दरम्यान पोलीस निरीक्षक जगदीश गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक चिलांगे, पीएसआय पांगारे, वसंत गजभिये, सत्यराव हेमने, संतोष चव्हाण, चुटे, नागरिकर आरिकर आदींना अंगणवाडी सेविकांकडून राख्या बांधण्यात आल्या. यावेळी गौतमी मंडपे, अनिता घोडीचोरे, मंगला लोखंडे, रंजना मोहूर्ले, सविता गणवीर, सुनीता तलवारे यांच्यासह जवळपास २० अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.