दारू पकडल्याचा कारवाईचा संताप; खामगाव पोलिस स्टेशनमध्ये दोघांचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 12:18 PM2018-09-11T12:18:28+5:302018-09-11T12:27:48+5:30
खामगाव : पोलिसांनी दारू पकडून प्रतिबंधात्मक कारवाई केल्याचा संताप अनावर झालेल्या दोघांनी सायंकाळी शहर पोलिस स्टेशनच्या आवारात धुमाकूळ घातला.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : पोलिसांनी दारू पकडून प्रतिबंधात्मक कारवाई केल्याचा संताप अनावर झालेल्या दोघांनी सायंकाळी शहर पोलिस स्टेशनच्या आवारात धुमाकूळ घातला. यावेळी पोलिसांना शिविगाळ करण्यात आली. त्यामुळे पोलिसांनी या दोघांना ‘पोलिसी’हीसका दाखविला.
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर दारूबंदी मोहिमेतंर्गत शहर पोलिसांनी संतोष विलास वाकोडे, गौतम विष्णु नाईक यांना सोमवारी सकाळी पकडले. यावेळी त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईचा संताप अनावर झालेल्या उपरोक्त दोघांनी सायंकाळी शहर पोलिस स्टेशन गाठले. माझी दारू का पकडली? अशी विचाराणा करीत एका पोलिस कर्मचाºयास पोलिस स्टेशनच्या आवारातच लोटपाट केली. त्याच्या डाव्या हाताच्या मनगटावर नखाने ओरखडे ओढले. शिविगाळ करीत पोलिस स्टेशनच्या आवारात चांगलाच धुमाकूळ घातला. त्यामुळे पोलिसांनी त्यांना आपला हिसका दाखविला. याप्रकरणी दोघांविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी कलम ३५३, ३३२ भादंविनुसार गुन्हा दाखल केला.