संतप्त ग्रामस्थांचा वीज अधिकाऱ्यांना घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 10:22 PM2019-02-13T22:22:06+5:302019-02-13T22:22:49+5:30
वीज पुरवठा खंडित करण्यासाठी आलेल्या वीज वितरण अधिकारी तथा कर्मचाºयांना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले. ही घटना बुधवारला दुपारी १२ वाजताच्या सुमारास मौदी पुनर्वसन येथे घडली. आधी मागण्यांची पुर्तता करा तेव्हाच विद्युत देयकाचा भरणा करु, या मागणीला घेवून ग्रामस्थांना वीज अधिकाºयांना घेराव घातला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अड्याळ : वीज पुरवठा खंडित करण्यासाठी आलेल्या वीज वितरण अधिकारी तथा कर्मचाºयांना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले. ही घटना बुधवारला दुपारी १२ वाजताच्या सुमारास मौदी पुनर्वसन येथे घडली. आधी मागण्यांची पुर्तता करा तेव्हाच विद्युत देयकाचा भरणा करु, या मागणीला घेवून ग्रामस्थांना वीज अधिकाऱ्यांना घेराव घातला.
भंडारा जिल्ह्यातील पुनर्वसनासह प्रकल्पग्रस्तांच्या समस्या अजूनही सुटलेल्या नाहीत. नागरी सुविधांचा वाणवा कायम आहे. पुनर्वसन क्षेत्रातील समस्या तात्काळ सोडविण्याचे गाजर शासन प्रशासन दाखवित आल्याने ग्रामस्थांचाही संयम सुटत आहे. मौदी पुनर्वसनात अशाच नागरी सुविधांचा अभाव आहे. वीजेच्या बाबतीत पुनर्वसनात समस्या उद्भवल्या आहेत.
मौदी पुनर्वसनात एकुण ७४ वीज ग्राहक असून मागील वर्षभरापासून एकही वीजधारकाने विद्युत बिल भरलेले नाही. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने पुनर्वसनातील वीज पुरवठा खंडीत करण्यासाठी अधिकारी व कर्मचाºयांची चमू पुनर्वसनस्थळी पोहचली. विद्युत बिलाचा भरणा न केल्यामुळेच वीज पुरवठा खंडीत केल्याची माहिती पहेला वीज वितरण उपकेंद्राचे सहायक अभियंता एस. के. गजभिये यांनी दिली. सकाळी ११ वाजतापासून अन्य मागण्यांसाठी ग्रामस्थांनी विद्युत रोहित्राजवळच विद्युत अधिकारी व कर्मचाºयांना घेराव घातला. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी ग्रामवासीयांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात प्रहार संघटनेचे संस्थापक आमदार बच्चु कडू यांनी, जेव्हापर्यंत पुनर्वसन क्षेत्रातील ग्रामस्थांच्या मागण्या पुर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही ग्रामस्थांच्या पाठीशी आहोत, असे म्हटले आहे.
आश्वासन नको रोजगार द्या
शासनाने नागरी सुविधा उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच पुनर्वसन क्षेत्रातील लाभार्थ्यांना रोजगार उपलब्ध करुन द्यावे, अशी मुख्य मागणी करण्यात आली होती. याच विषयाला घेवून ग्रामवासीयांनी बुधवारी एल्गार पुकारला. रोजगार उपलब्ध करुन देणार नाही. तोपर्यंत कुठलाही शासकीय कर किंवा देयकाचा भरणा करणार नाही, अशी भूमिका घेतली. तसेच आगामी निवडणुकीतही मतदानावर बहिष्कार घालण्याचा ठाम निर्धारही ग्रामवासीयांनी यावेळी व्यक्त केला.