पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे जनावरांचा मृत्यू

By admin | Published: October 29, 2016 12:40 AM2016-10-29T00:40:29+5:302016-10-29T00:40:29+5:30

आंधळगाव पोलीस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या गायमुख रामपूर येथील बैलबाजारातून आंधळगाव-रामटेक मार्गे कामठी कत्तलखान्यात जनावरांची वाहतूक होत असते.

Animal death due to police negligence | पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे जनावरांचा मृत्यू

पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे जनावरांचा मृत्यू

Next

पत्रपरिषद: ठाणेदारासह, पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला निलंबित करा, बजरंग दलाची मागणी
मोहाडी : आंधळगाव पोलीस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या गायमुख रामपूर येथील बैलबाजारातून आंधळगाव-रामटेक मार्गे कामठी कत्तलखान्यात जनावरांची वाहतूक होत असते. आंधळगाव पोलिसांनी १५ आॅक्टोंबरला सकाळी ८.३० वाजता जनावरांनी धरलेला बोलेरो पिकअप मिनीट्रक पकडला. पोलीस ठाण्याच्या मागच्या बाजुस आणून ठेवला. दुपारी दोन वाजेपर्यंत त्या जनावरांची काळजी घेण्यात न आल्याने ३ जनावरे मरण पावले. पशुवैद्यकीय अधिकारीही सायंकाळी ५ वाजता आली. त्यामुळे त्या जनावरांच्या मृत्युस ठाणेदार व पशुवैद्यकीय अधिकारी जबाबदार असल्याने त्यांना निलंबित करावे, अशी मागणी पत्रपरिषदेद्वारे बजरंगदल जिल्हा संयोजक तिलक वैद्य, विश्वहिंदू परिषदेचे अ‍ॅड. प्रशांत मिश्राम आदींनी केली आहे.
रामपूर गायमुख येथे बुधवारला बैलबाजार भरवीला जातो. यासाठी जिल्हा परिषदेची परवानगी घेण्यात आलेली नाही. या बैलबाजारातून घेतलेली जनावरे आंधळगाव-रामटेक मार्गे कामठी येथील कत्तलखान्यात नेली जातात. पोलीस एकादवेळ कार्यवाही करतात.
१५ आॅक्टोबरला सुद्धा बोलेरोपिकअप या मिनीट्रकला आंधळगाव पोलिसांनी सकाळी ८.३० वाजता पकडले. या मिनीट्रकमध्ये १९ जनावरे ठासून भरलेली होती.
या मिनीट्रकला दुपारी २ वाजेपर्यंत पोलीस ठाण्याच्या मागे उभा ठेवण्यात आल्याने ३ जनावरे मरण पावली. पशुवैद्यकीय अधिकारीही सायंकाळी ५ वाजता आले. या प्रकरणातील आरोपींना त्यांच्याच कारमध्ये बसवून न्यायालयात नेण्यात आले.
बोलेरो पिकअप मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला नाही. पकडलेल्या १६ जनावरांना गडेगाव येथील कुसुम गौशालेत पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र या गौशालेत पाठविण्यात आलेल्या जनावरांचा हिशोबच लागत नाही. त्यामुळे पोलिसांनी रेंगेपार येथील मातोश्री गौशाळेत पकडलेले जनावरे पाठवावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली असून पुढेही जर अशीच गौवाहतूक सुरू राहिली तर बजरंग दलातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
पत्रपरिषदेला तिलक वैद्य, अ‍ॅड. प्रशांत मिश्रा, तालुका संयोजक हर्षल जावळकर, सोनू मेहर, ज्योतिष नंदनवार, स्वप्नील तिघरे, राम कांबळे, जिबील डुंबरे, सचिन पारधी, मनिष चिंधालोरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Animal death due to police negligence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.