जनावरांची अवैध तस्करी करणारी टोळी सक्रिय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:24 AM2021-07-10T04:24:57+5:302021-07-10T04:24:57+5:30
आठ दिवसांपूर्वी रोहणा येथे एका वाहनाला गावकऱ्यांनी थांबविण्याचा प्रयत्न केला तेव्हा पिकअप गाडीचालकाने एका व्यक्तीच्या अंगावर वाहन घालण्याचा प्रयत्न ...
आठ दिवसांपूर्वी रोहणा येथे एका वाहनाला गावकऱ्यांनी थांबविण्याचा प्रयत्न केला तेव्हा पिकअप गाडीचालकाने एका व्यक्तीच्या अंगावर वाहन घालण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही पोलिसांचे पूर्णतः दुर्लक्ष आहे. नागपूर, कामठी येथे मोठ्या प्रमाणात जनावरांच्या मांसाची मागणी असल्याने रोज दहा ते पंधरा पिकअप गाड्या जनावरे घेऊन नागपूर, कामठी येथे व्यापाऱ्यांनी सांगितलेल्या ठिकाणी छुप्या मार्गाने घेऊन जातात. धानाचे चुकारे मिळाले नसल्याने शेतकरी मातीमोल भावाने दलालांना आपली जनावरे विकत आहेत. नागपूर येथील व्यापाऱ्यांचे जिल्ह्यात गावागावांत दलाल असून त्यांना जनावरे घेण्यासाठी त्यांच्या बँक खात्यात पैसे टाकतात. बँकेतून पैसे काढून दलाल रोज आपल्या दुचाकीने परिसरातील गावात सकाळीच जाऊन शेतकऱ्यांकडून कमी पैशांत जनावरे घेत जमा करतात. पोलीसही काही वेळेस गोशाळेत जनावरे पाठवितात. गोशाळाचालक न्यायालयाचे निकाल येण्यापूर्वीच पोलिसांनी पाठविलेली जनावरे विकून टाकतात. जनावरे मरण पावली असे सांगतात. काही गोशाळाचालक तर स्वतःच कामठी, नागपूर येथील व्यापाऱ्यांना कटाईसाठी जनावरे विकतात अशी माहिती आहे. याकड़े आंधळगाव पोलीस विभागाचे लक्ष नसल्याने जिल्हा पोलीस अधीक्षकांनी लक्ष देण्याची गरज आहे.