कत्तलखान्याकडे जाणारी जनावरे पकडली
By admin | Published: September 12, 2015 12:29 AM2015-09-12T00:29:32+5:302015-09-12T00:29:32+5:30
पोळ्याच्या पूर्वसंध्येला बैल बाजार भरवून शेकडो जनावरांना ट्रकमध्ये कोंबून कत्तलखान्याकडे नेण्याच्या तयारीत असताना ....
बैल बाजारातील घटना : बजरंग दलाची कारवाई
भंडारा : पोळ्याच्या पूर्वसंध्येला बैल बाजार भरवून शेकडो जनावरांना ट्रकमध्ये कोंबून कत्तलखान्याकडे नेण्याच्या तयारीत असताना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी जनावरांना पकडले. दरम्यान एक ट्रक पळून जाण्यात यशस्वी ठरला.
पोळा रविवारला असल्यामुळे आज शुक्रवारला बैल बाजार भरविण्यात येणार असल्याची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. त्यावर नजर ठेऊन कार्यकर्ते सज्ज असताना दुपारच्या सुमारास बैल बाजारात जनावरे येण्यास सुरूवात झाली. दुपारी ३ ते चारच्या दरम्यान बाजार भरलेला असताना नागपूर येथून आठ ते दहा रिकामे ट्रक बैल बाजारात आले. त्यापूर्वीच कसायांनी बैलांची खरेदी विक्री केली होती. त्यानंतर या जनावरांना ट्रकमध्ये कोंबण्यात आले होते. बजरंग दलाचे कार्यकर्ते ताफ्यासह पोहोचले असता सात ट्रक सापडले. एका ट्रक चालकाने पळ काढला. या सात ट्रकमध्ये असलेल्या २०० हून अधिक गायी व बैलांना खाली उतरविण्यात आले. याशिवाय विक्रीसाठी असलेल्या ३०० हून अधिक बैल खुंटीला बांधून बाजारात होते. त्यानंतर या बैलांची मालीपार, चांदोरी, गडेगाव, डोंगरी व लाखनी येथील गोरक्षणमध्ये रवानगी करण्यात आली. जनावरे पकडून देणाऱ्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य सुभाष आजबले, अॅड. प्रभात मिश्रा, डॉ.संजय एकापुरे, शिवा भंडारी, विकास मदनकर, आशिष मोहबे, शैलेंद्र श्रीवास्तव, शमा दोनोडे, बंडूभाऊ बारापात्रे, प्रशांत खोब्रागडे यांचा समावेश होता.