स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:32 AM2021-01-13T05:32:31+5:302021-01-13T05:32:31+5:30
कोंढा-कोसरा : कोंढा येथील गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी ...
कोंढा-कोसरा : कोंढा येथील गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डी. एस. चेटुले हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डी. एन. माहुरे, तसेच एल. एन. काटेखाये हे होते. यावेळी अध्यक्ष प्राचार्य चेटुले यांनी स्वामी विवेकानंद व माँ जिजाऊ यांच्या जीवनकार्याची माहिती दिली. राजमाता जिजाऊंनी शिवाजीराजे घडविले म्हणून स्वराज्य निर्माण होऊ शकले असे सांगितले. स्वामी विवेकानंद यांनी शिकागो धर्म परिषदेमध्ये हिंदू धर्माची महती सांगितली. त्यामुळे हिंदू धर्मातील तत्त्वज्ञान श्रेष्ठ असल्याचे जगासमोर आल्याचे सांगितले. संचालन एम. एम. सलामे यांनी केले तर आभार आर. एन. भोपे यांनी मानले.