अवैध व्यावसायिकांना निर्वाणीचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 09:41 PM2018-07-20T21:41:08+5:302018-07-20T21:41:26+5:30
अड्याळ पोलीस स्टेशन हद्दितील ६९ गावातील एकुण ४८ पोलीस पाटलांची तातडीची बैठक पोलीस स्टेशन अड्याळ येथे नुकतीच घेण्यात आली. त्यात प्रत्येक पोलीस पाटलांनी नवनियुक्त ठाणेदार सुरेश ढोबळे यांनी कुठे काय होत आहे, याची माहिती घेतली. तसेच अवैध व्यवसाय करणाऱ्यांनी धंदे बंद करावे, अन्यथा दंडात्मक कार्यवाहीला तयार राहावे अशा सूचनाही देण्यात आल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
अड्याळ : अड्याळ पोलीस स्टेशन हद्दितील ६९ गावातील एकुण ४८ पोलीस पाटलांची तातडीची बैठक पोलीस स्टेशन अड्याळ येथे नुकतीच घेण्यात आली. त्यात प्रत्येक पोलीस पाटलांनी नवनियुक्त ठाणेदार सुरेश ढोबळे यांनी कुठे काय होत आहे, याची माहिती घेतली. तसेच अवैध व्यवसाय करणाऱ्यांनी धंदे बंद करावे, अन्यथा दंडात्मक कार्यवाहीला तयार राहावे अशा सूचनाही देण्यात आल्या.
बैठकीत पोलीस अधिकारी व कर्मचारी अवैध व्यवसाय सुरु ठेवण्यााठी हप्ता वसुली जर करत असेल तर अंशाची व्हिडीओ क्लीप तयार करा. त्यामुळे त्यांच्यावरही खंडणी वसुलीचा गुन्हा दाखल करण्यात येईल.
पोलीस स्टेशन अड्याळ हद्दीतील अवैध व्यवसाय आहेत, ते आतातरी बंद व्हावे यासाठी ही माहिती पोलीस पाटलांतर्फे संपुर्ण अवैध व्यवसायीकांना याविषयीची माहिती मिळावी म्हणून ही बैठक असल्याची चर्चा होती.
नवनियुक्त पोलीस निरीक्षकांना वर्षभर सांभाळताच अमित भारत भिवगडे व रोशन अंबादास सेलोकर या दोन आरोपींना गो तस्करी करतांना रंगेहात पकडून अटक केली. एका माहितीनुसार क्र. एम एच ३६ एफ २६००६ यामध्ये ४ बैल अवैधरित्या घालुन कोंढा येथून कळमना नागपूर येथे जात होते.
सदर कारवाईनंतर या चारही बैलांना सडक पिंपळगाव लाखनी येथील गोशाळेत रवानगी केल्याची माहिती पिएसआय नितीन दांडळे यांनी दिली.
काही दिवसाआधी जो प्रकार अड्याळ येथून अवघ्या दोन किलोमिटर अंतरावरील सौंदड सुरबोडी पुर्नवसनात घडला. त्या पध्दतीचा प्रकार, घटना होवु नये म्हणून संपूर्ण अवैध धंदे बंदीचा फतवा तर निघाला पंरतु कार्यवाहीमुळे आता अवैध व्यवसायीकही धास्तावलेल्या स्थितीत आढळून येत आहेत.
झालेल्या प्रकरणात कर्तव्यावर असूनसुध्दा हयगय केल्यामुळे अड्याळ पोलीस स्टेशन मधील १० ते ११ पोलीस कर्मचाºयांना निलंबनाचे आदेश पत्र आले आहेत. परंतु यामध्ये कुठलाही मोठा पोलीस अधिकारी मात्र निलंबित झालेला नाही. यात निलंबित झालेले सर्वच दोषी आहेत का? याचीही चर्चा होत आहे.
नवनियुक्त ठाणेदार किती दिवसांसाठी आहेत कारण याच ठाणेदार सुरेश ढोबळे यांना अड्याळ पोलीस स्टेशन मधून अवघ्या तीन चार महिन्यातच बदलीचा आदेश मिळाला होता. अवैध धंदे फोफावण्यामागे लहान पोलीस कर्मचाºयांचा हात असतो, की मोठ्या पोलीस अधिकाºयांचाही हात असतो अशीही चर्चा गावातील पानपटपरीवर सध्या मोठ्या प्रमाणात सुरु आहे.