लाखनी तालुक्यात डेंग्यूचा दुसरा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:42 AM2021-09-07T04:42:28+5:302021-09-07T04:42:28+5:30
यश रवींद्र मेश्राम (२१) असे मृताचे नाव आहे. तो पुणे येथे कॉम्प्युटर सायन्स विषयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. पुण्याहून ...
यश रवींद्र मेश्राम (२१) असे मृताचे नाव आहे. तो पुणे येथे कॉम्प्युटर सायन्स विषयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. पुण्याहून परत आल्यापासून काही दिवसांपासून आजारी होता. त्याच्यावर लाखनी येथील खासगी डॉक्टरांकडे उपचार करण्यात आले. त्यानंतर भंडारा येथील एका हॉस्पिटलमध्ये भरती केले. तिथे रक्त व इतर चाचण्या तपासल्यानंतर त्याला डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर उपचार सुरू असताना त्याची प्रकृती गंभीर झाली. त्याला नागपूर येथे हलविण्यात आले. दरम्यान, रविवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. मेश्राम परिवारातील एकुलता एक मुलगा होता. पोळा सणाच्या पूर्वसंध्येला ही घटना घडल्याने परिसरात दुःखाचे व भीतीचे वातावरण पसरले आहे.
बॉक्स
ग्रामपंचायत आणखी किती लोकांचे बळी घेईल
मुरमाडी (सावरी) जवळपास १२ हजार लोकसंख्येचे मोठे गाव आहे. गावात मोठ्या प्रमाणात विविध आजारांचे रुग्ण आढळून येत आहेत. डासांमुळे होणाऱ्या साथीच्या आजाराचे रुग्ण पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. इतर ग्रामपंचायतींप्रमाणे मुरमाडी ग्रामपंचायतीने अद्यापपर्यंत फवारणी केली नाही. त्यामुळे लोकांचे जीव गेल्यानंतर ग्रामपंचायत फवारणी करेल काय, असा सवाल विचारला जात आहे.
060921\img-20210906-wa0119.jpg
photo