ॲन्टिजेन टेस्ट बंद : ग्रामस्थांची पंचाईत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:35 AM2021-04-17T04:35:18+5:302021-04-17T04:35:18+5:30
गावागावात ग्रामस्थांची कोरोना टेस्ट केल्या जात होती. यामध्ये अनेक कोरोना पॉझिटिव्ह लोकांचा शोध लागत होता तसेच त्यांना विलगीकरणार ठेवण्यात ...
गावागावात ग्रामस्थांची कोरोना टेस्ट केल्या जात होती. यामध्ये अनेक कोरोना पॉझिटिव्ह लोकांचा शोध लागत होता तसेच त्यांना विलगीकरणार ठेवण्यात येत होते. यामुळे त्यांच्यापासून इतरांना कोरोनाचा धोका कमी होत होता. आता मात्र शासनाने टेस्ट करणे बंद केल्याचे निर्देश दिल्याने जिल्हा ठिकाणी असलेल्या आरटीपीसीआरसाठी जावे लागणार आहे. तसेच खासगी दवाखान्यांना ही टेस्ट करण्यासाठी एकप्रकारची लूट करण्याची आयती संधी मिळून आली आहे, असा सूर गावकऱ्यांमध्ये आहे. आरटीपीसीआर टेस्टचा रिपोर्ट येण्यासाठी दोन दिवसाच्या अवधी लागत असून, या दोन दिवसांमध्ये प्रकृती खालावण्याचा धोका आहे. त्यामुळे ॲन्टिजेन टेस्ट सुरू करण्याची मागणी होताना दिसत आहे.
बॉक्स
ॲन्टिजेन टेस्टमुळे पॉझिटिव्ह रुग्णांच्या शोध वेळेवर लागत असल्याने इतर गावकऱ्यांना यापासून वाचण्यासाठी मदत मिळत होती. मात्र आता शासनाने ही टेस्ट बंद केल्याने गावकऱ्यांना फार मोठा त्रास सहन करावा लागणार आहे.
विनोद बांते, उपसरपंच, भिलेवाडा.