75 हजार व्यक्तींची ॲन्टीजेन चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 05:00 AM2020-12-11T05:00:00+5:302020-12-11T05:00:21+5:30
भंडारा जिल्हा लाॅकडाऊनच्या सुरुवातीला काेराेनामुक्त हाेता. मात्र संशयीत व्यक्तींची तपासणी सुरुवातीपासूनच केली जात हाेती. सुरुवातीला जिल्ह्यात केवळ आरटीपीसीआर चाचणी केली जात हाेती. या चाचणीचा अहवाल नागपूर येथून प्राप्त हाेत हाेता. जिल्ह्यात पहिला रुग्ण २७ एप्रिल राेजी भंडारा तालुक्यातील गराडा येथे आढळून आला हाेता. त्यानंतर मे, जून आणि जुलै महिन्यात रुग्णांची संख्या कमी हाेती. मात्र ऑगस्ट महिन्यापासून रुग्णांची संख्या वाढायला लागली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात काेराेना निदानासंदर्भात आतापर्यंत ९४ हजार ४२२ व्यक्तींची चाचणी करण्यात आली असून त्यात सर्वाधिक ७५ हजार ८७ व्यक्तींनी ॲन्टीजेन चाचणी केली आहे. ॲन्टीजेनमध्ये ८५१०, आरटीपीसीआरमध्ये २७३८ आणि टीआरयूएनएटी चाचणीत १२२ व्यक्ती असे एकूण ११ हजार ३७०व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत.
भंडारा जिल्हा लाॅकडाऊनच्या सुरुवातीला काेराेनामुक्त हाेता. मात्र संशयीत व्यक्तींची तपासणी सुरुवातीपासूनच केली जात हाेती. सुरुवातीला जिल्ह्यात केवळ आरटीपीसीआर चाचणी केली जात हाेती. या चाचणीचा अहवाल नागपूर येथून प्राप्त हाेत हाेता. जिल्ह्यात पहिला रुग्ण २७ एप्रिल राेजी भंडारा तालुक्यातील गराडा येथे आढळून आला हाेता. त्यानंतर मे, जून आणि जुलै महिन्यात रुग्णांची संख्या कमी हाेती. मात्र ऑगस्ट महिन्यापासून रुग्णांची संख्या वाढायला लागली. ऑगस्टमध्ये १०३६ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले. तर सप्टेंबरमध्ये ३९५८ व्यक्ती काेराेनाबाधित झालेत. नाेव्हेंबर महिन्यात रुग्णांची संख्या कमी झाल्याचे दिसून आले. दरम्यानच्या काळात आरटीपीसीआर चाचणी साेबतच ॲन्टीजेन सुरु करण्यात आली. यामुळे तात्काळ निदान करणे शक्य झाले.
भंडारा जिल्हृयात आतापर्यंत ९४४२२ व्यक्तींची काेराेना चाचणी करण्यात आली. त्यात आरटीपीसीआर चाचणी १९ हजार ५२ व्यक्तींचा समावेश आहे. त्यात २७३८ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले. ७५ हजार ८७ व्यक्तींची ॲन्टीजेन चाचणी करण्यात आली असून त्यात ८५१० व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळले आहे तर टीआरयूएनएटी चाचणी २८३ व्यक्तींची करण्यात आली. त्यात १२२ व्यक्ती असे एकूण ११ हजार ३७० व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयासह काेविड केअर सेंटरवर चाचणीची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे.
गुरुवारी एकाचा मृत्यू ७१ पाॅझिटिव्ह
जिल्ह्यात गुरुवारी ५६७व्यक्तींची काेराेना चाचणी करण्यात आली. त्यापैकी ७१ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळले आहे. तर तुमसर तालुक्यातील ५९ वर्षीय व्यक्तीचा काेराेनाने मृत्यू झाला. गुरुवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये भंडारा २४, माेहाडी ५, तुमसर १८, पवनी २, लाखनी ४, साकाेली १३ आणि लाखांदूर तालुक्यात ५ रुग्ण आढळून आले आहेत. गुरुवारी ६० व्यक्ती काेराेनामुक्त झाले असून आतापर्यंत दहा हजार ५०६ व्यक्तींनी काेराेनावर यशस्वी मात केली आहे. जिल्ह्यात ई-संजीवनी ओपीडी सुरु करण्यात आली असून येथे आतापर्यंत १३४९ जणांनी लाभ घेतला आहे. काेराेना संक्रमण राेखण्यासाठी प्रशासनाच्यावतीने विविध उपाय केले जात आहे.