एपीएल शिधापत्रिकाधारकांना मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:26 AM2021-06-01T04:26:38+5:302021-06-01T04:26:38+5:30
भंडारा :- सद्य:स्थितीत सुरू असलेल्या कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या कालावधीत जिल्ह्यातील शासकीय गोदामामध्ये तसेच रास्तभाव दुकानामध्ये शिल्लक असलेल्या अन्नधान्याचे वाटप ...
भंडारा :- सद्य:स्थितीत सुरू असलेल्या कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या कालावधीत जिल्ह्यातील शासकीय गोदामामध्ये तसेच रास्तभाव दुकानामध्ये शिल्लक असलेल्या अन्नधान्याचे वाटप राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत जिल्ह्यातील एपीएल (केशरी) शिधापत्रिकेवरील लाभार्थ्यांना प्रतिमाह प्रतिव्यक्ती १ किलो गहू व १ किलो तांदूळ याप्रमाणे २ किलो अन्नधान्य माहे जून २०२१ करिता सवलतीच्या दराने गहू ८ रुपये व तांदूळ १२ रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध होणार आहे. तसेच सदर अन्नधान्याचे वितरण प्रथम मागणी करणाऱ्यास देणे या तत्त्वानुसार करण्यात येईल.
कोविड १९ प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन कालावधीत राज्यातील कुठलाही नागरिक उपाशी राहता कामा नये या उद्देशाने शासनाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना माहे मे २०२० ते ऑगस्ट २०२० या चार महिन्यांच्या कालावधीत सवलतीच्या दराने गहू ८ रुपये व तांदूळ १२ रुपये प्रतिकिलो प्रतिमाह प्रतिव्यक्ती ३ किलो गहू व २ किलो तांदूळ याप्रमाणे ५ किलो अन्नधान्याचा लाभ देण्यात आला आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल बनसोड यांनी कळविले आहे.