सिंचन विहिरीसाठी आॅनलाईन अर्ज करा

By admin | Published: November 17, 2016 12:42 AM2016-11-17T00:42:13+5:302016-11-17T00:42:13+5:30

मागेल त्याला विहिर या महत्वाकांक्षी कार्यक्रमांतर्गत भंडारा जिल्ह्यात १ सिंचन विहिरीचा धडक कार्यक्रम राबविण्यात येत असून ...

Apply online for irrigation well | सिंचन विहिरीसाठी आॅनलाईन अर्ज करा

सिंचन विहिरीसाठी आॅनलाईन अर्ज करा

Next

जिल्हाधिकारी यांचे आवाहन : शेतकऱ्यांसाठी एक हजार सिंचन विहिरीची योजना
भंडारा : मागेल त्याला विहिर या महत्वाकांक्षी कार्यक्रमांतर्गत भंडारा जिल्ह्यात १ सिंचन विहिरीचा धडक कार्यक्रम राबविण्यात येत असून यासाठी शेतकऱ्यांनी आॅनलाईन अर्ज सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सिंचन विहिरीच्या धडक कार्यक्रमासाठी आॅनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याची सुविधा आपले सरकार या संकेतस्थळावर १५ आॅक्टोंबर पासून उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सिंचन विहिर योजनेसाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अर्ज करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केली आहे.
आपले सरकार पोर्टलवर मागेल त्याला शेततळे येथे क्लिक करुन मागेल त्याला विहिर येथे क्लिक करावे. क्लिक केल्यानंतर आपल्या नावाची नोंदणी करावी. नोंदणी झाल्यानंतर सिंचन विहिरीसाठी अर्ज येथे क्लिक केल्यानंतर दिलेल्या अर्जाच्या नमुन्यात माहिती भरावयाची आहे. अजार्सोबत आवश्यक दस्ताऐवज अपलोड करणे आवश्यक असून यासाठी २० रुपये सेवा शुल्क लागू राहील. मागेल त्याला विहिर या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांकडे त्यांच्या नावावर कमीत कमी ०.६० हेक्टर जमीन असावी. यासाठी कमाल मयार्दा नाही. लाभार्थी शेतकऱ्यांची जमीन विहिरीसाठी तांत्रिकदृष्टया पात्र असणे आवश्यक आहे. यापूर्वी अर्जदाराने शेततळे, सामुदायिक शेततळे, भातकचरा सोबत बोडी व विहिर या घटकाचा शासकीय योजनेतून लाभ घेतलेला नसावा. दोन अथवा तीन लाभार्थ्यांनी त्यांची जमीन सलग असल्यास सामुदायिक विहिरीची मागणी केली तर ते सामुदायिकरीत्या विहिर मिळण्यास पात्र असतील. यासाठी पाण्याचा वापर व पाण्याची हिस्सेवारी याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी १०० रुपये स्टॅम्प पेपरवर करार आवश्यक आहे.
शेतकरी कुटुंबामध्ये आत्महत्या झालेली आहे. त्याचे वारसदार, दारिद्रय रेषेखालील बीपीएल शेतकरी व इतर लाभार्थी या योजनेसाठी प्राथमिकतेनुसार लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल. भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शासनाच्या मागेल त्याला सिंचन विहिरी योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे जिल्हाधिकारी यांनी आवाहन केले आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Apply online for irrigation well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.