स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 11:07 PM2018-08-14T23:07:27+5:302018-08-14T23:08:09+5:30

स्वामीनाथन आयोग लागू करून शेतकऱ्यांना हमीभाव देण्यात यावा, आणेवारी जुनी पद्धत बदलून मंडळ ऐवजी गाव गृहीत धरण्यात यावे, २०१७-१८ च्या खरीप व रब्बी हंगामातील पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना त्वरित देण्यात यावी, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी यासह अन्य मागण्यांचे निवेदन माजी खासदार नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली भंडारा जिल्हा कॉंग्रेस कमेटीच्या शिष्टमंडळाने सोमवारला जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांना सादर करण्यात आले.

Apply the recommendations of Swaminathan Commission | स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा

स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा

Next

नाना पटोले : शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, काँगे्रसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : स्वामीनाथन आयोग लागू करून शेतकऱ्यांना हमीभाव देण्यात यावा, आणेवारी जुनी पद्धत बदलून मंडळ ऐवजी गाव गृहीत धरण्यात यावे, २०१७-१८ च्या खरीप व रब्बी हंगामातील पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना त्वरित देण्यात यावी, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी यासह अन्य मागण्यांचे निवेदन माजी खासदार नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली भंडारा जिल्हा कॉंग्रेस कमेटीच्या शिष्टमंडळाने सोमवारला जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांना सादर करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी फसवी आहे. १७ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देण्याची घोषणा करून प्रत्यक्षात चार हजार कोटी रुपये माफ करण्यात आले. शेतकºयांना आॅनलाइन फार्म भरण्याची सक्ती करून प्रचंड मनस्ताप देण्यात आला. एवढे करून त्यांच्या पदरी निराशा पडली. सन २०१८ चा शेवट होत असतांनाही शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा देण्यात आला नाही. शासनाने या कर्जमाफीचा फेर विचार करून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सरकारने दिलेल्या सरसकट कर्जमाफी प्रमाणे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, शेतकऱ्यांना सन २०१७-१८ मधील पीक रक्कम अजून देण्यात आली नाही ती त्वरीत देण्यात यावी, सध्याची आणेवारी काढण्याची पद्धत ब्रिटिशकालीन आहे, त्यात बदल करून मंडळ ऐवजी गाव गृहीत धरणारी नवी पद्धत अमलात आणण्यात यावी आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे
शिष्टमंडळात भंडारा जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रेमसागर गणवीर, माजी आमदार आनंदराव वंजारी, प्रमोद तीतीरमारे, मधुकर लीचडे, सीमा भुरे, हेमराज कापगते, प्रेम वणवे, रेखा वासनिक, के.के पंचबुद्धे, नीलकंठ कायते, राजकपूर राऊत, प्रणाली ठाकरे, शोभा बुरडे, पंकज कारेमोरे, मनोहर राऊत, प्यारेलाल वाघमारे, विकास राऊत, भाग्यश्री गिलोरकर, अमर रंगडे, मनोहर उरकुडे, नैना चांदीवर, दीपक गजभिये, सुरेखा इलमे, देवेंद्र गावंडे, गजानन झंझाड, शिशीर वंजारी, अनिक जामा, धनराज साठवणे, मुकुंद साखरकर, स्नेहल रोडगे, सचिन घनमारे, रमेश पारधी, कलाम शेख, शंकर राऊत, प्रशांत देशकर उपस्थित होते.

Web Title: Apply the recommendations of Swaminathan Commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.