निवासी शाळेसाठी २५ सप्टेंबरपर्यंत करा अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:41 AM2021-09-24T04:41:23+5:302021-09-24T04:41:23+5:30
एकलव्य मॉडेल रेसिडेन्शिअल इयत्ता सहावी वर्गात नवीन प्रवेश व इयत्ता सातवी ते ९ वीच्या वर्गातील रिक्त जागा भरण्याकरिता हे ...
एकलव्य मॉडेल रेसिडेन्शिअल इयत्ता सहावी वर्गात नवीन प्रवेश व इयत्ता सातवी ते ९ वीच्या वर्गातील रिक्त जागा भरण्याकरिता हे अर्ज मागविण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी आवेदन पत्र भरताना वार्षिक परीक्षेच्या गुणांच्या आधारे एकूण प्राप्त गुणांची परिपूर्ण माहिती भरणे आवश्यक आहे. अर्ज भरण्यासाठी ॲडमिशन ईएमआरएसमहाराष्ट्र डॉट कॉम या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विद्यार्थी अनुसूचित जमातीचा, आदिम जमाती अदिवासी असावा. सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात इयत्ता ५ वी व ६ वी ते ८ वीचे वर्गात मान्यता प्राप्त शाळेत शिक्षण घेणारा असावा. पालकाचे उत्पन्न सरासरी एकत्रित सहा लाख रुपयांच्या आत असावे, सोबत दाखला जोडावा . विद्यार्थ्यांनी शिकत असलेल्या शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र जोडावे. सक्षम अधिकाऱ्यांकडील प्राप्त विद्यार्थ्यांचे जातीचा दाखला अर्जासोबत जोडावा. अधिक माहिती करिता प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भंडारा यांचे कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन निरज मोरे यांनी केले आहे.