सहा हजार कोटींची कामे मार्गी लावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 10:59 PM2018-06-13T22:59:28+5:302018-06-13T23:00:26+5:30
नवनिर्वाचित खासदार मधुकर कुकडे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नागपुरात भेट घेऊन भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाकरिता सहा हजार कोटींची कामे मंजूर झाली आहेत. ती सर्व कामे त्वरीत मार्गी लागावी, अशी मागणी खासदार कुकडे यांनी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : नवनिर्वाचित खासदार मधुकर कुकडे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नागपुरात भेट घेऊन भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाकरिता सहा हजार कोटींची कामे मंजूर झाली आहेत. ती सर्व कामे त्वरीत मार्गी लागावी, अशी मागणी खासदार कुकडे यांनी केली.
यात गोंदिया जिल्हा राष्ट्रीय महामार्ग १९८. ६० कि़मी. किंमत २०७५ कोटी, केंद्रीय मार्ग निधी ५४. २५ कि़मी. किंमत २१९. २० कोटी, भंडारा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग २३७. २४ कि़मी. किंमत ३७४१ कोटी, केंद्रीय मार्ग निधी ४६ कोटींची कामे प्रस्तावित असून मंजूर झाली आहेत. ही सर्व कामे मार्गी लावण्याची मागणी खा.
मधुकर कुकडे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना केली.
नागपूर येथे खा. कुकडे यांनी नितीन गडकरी, भंडाऱ्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची स्वतंत्र भेट घेऊन भंडारा व गोंदिया जिल्ह्याच्या विकासात्मक कामावर चर्चा केली. दोन्ही मंत्र्यांनी यावेळी खा. कुकडे यांना विकासात्मक कामात राजकारण आडवे येणार नाही, अशी ग्वाही दिली.