कोविड उपचारासाठी २२ डॉक्टरांची नेमणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:35 AM2021-04-16T04:35:51+5:302021-04-16T04:35:51+5:30

मार्च व एप्रिल महिन्यात कोरोना रुग्णसंख्येचा आलेख अचानक वाढला आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताणही वाढला आहे. ही बाब लक्षात ...

Appointment of 22 doctors for covid treatment | कोविड उपचारासाठी २२ डॉक्टरांची नेमणूक

कोविड उपचारासाठी २२ डॉक्टरांची नेमणूक

Next

मार्च व एप्रिल महिन्यात कोरोना रुग्णसंख्येचा आलेख अचानक वाढला आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताणही वाढला आहे. ही बाब लक्षात घेता, जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी डॉक्टर व अधिपरिचारिका यांना सेवा देण्याचे आवाहन केले होते. प्राप्त अर्जानुसार २२ डॉक्टर व ७५ आरोग्य सेविकांना नेमणूक देण्यात आली आहे. डॉक्टरांमध्ये बीएएमएस व बीडीएस डॉक्टरांचा समावेश आहे. या डॉक्टरांची जिल्हा रुग्णालय, साकोली व तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयासह भंडारा, लाखनी, पवनी येथील कोविड केअर सेंटरमध्ये नेमणूक करण्यात आली आहे. यापैकी काही डॉक्टर रुजू झाले असून, उर्वरित डॉक्टर लवकरच रुजू होतील, असा विश्वास आरोग्य विभागाला आहे.

कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढल्याने कोविड रुग्णांची शुश्रूषा करण्यासाठी अधिक संख्येने अधिपरिचारिकांची आवश्यकता भासत आहे. यासाठी वारंवार जाहिरात देऊनही हवा तसा प्रतिसाद न मिळाल्याने शासनाने आरोग्य सेविकांची नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार आरोग्य विभागाने १३ एप्रिलच्या आदेशानुसार ७५ आरोग्य सेविकांची कंत्राटी स्वरूपात तात्पुरत्या कालावधीकरिता नियुक्ती केली आहे. त्यांची जिल्हा रुग्णालय, साकोली, तुमसर उपजिल्हा रुग्णालय, तसेच भंडारा, लाखनी व पवनी कोविड केअर सेंटर येथे नेमणूक करण्यात आली आहे. जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या पाहता आरोग्य विभागाला अधिकच्या मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहेच. वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत खासगी डॉक्टर व अधिपरिचारिका तसेच आरोग्य सेविकांनी आपल्या सेवा शासनाला द्याव्यात, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

बाॅक्स

उपचारासाठी मोठ्या मनुष्यबळाची गरज

जिल्ह्यात कोरोनाच्या चाचण्या मोठ्या प्रमाणात सुरू असून, पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे रुग्णावरील उपचारासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागत आहे. अशावेळी वैद्यकीय प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध झाल्यास त्याचा लाभ रुग्णांना होऊ शकतो. ही बाब लक्षात घेता एमबीबीएस झालेले विद्यार्थी, नर्सिंग अभ्यासक्रम पूर्ण केलेले व डॉक्टर यांच्या सेवेची शासकीय आरोग्य विभागाला नितांत गरज आहे. शासकीय आरोग्य सेवेतून निवृत्त झालेले डॉक्टरसुद्धा आपल्या सेवा देऊ शकतात. यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय, भंडारा यांच्याशी थेट संपर्क साधावा, असे जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी सांगितले.

Web Title: Appointment of 22 doctors for covid treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.